बुधवार, १८ मार्च, २०१५

' ट्विटर ट्रेंड :मराठी संस्कृती अटकेपार नेण्यासाठीचे सर्वोत्तम माध्यम! 'रोखठोक..


' ट्विटर ट्रेंड : मराठी संस्कृतीला अटकेपार नेण्यासाठीचे सर्वोत्तम माध्यम'


नमस्कार, सोशल मीडियाचे वादळ सर्वत्र चांगलेच घोंगावत आहे . सोशल मीडियात twitter हे सर्वात प्रभावी माध्यम आहे,कारण सर्व प्रमुख बाबींची दखल घेणारे लोक,सामाजिक संस्थांची accounts,celebrities,राजकारणी,समाजकारणी,खेळाडू,अंतराळवीर,पत्रकार,न्यूज़ चैनल्स इ. अर्थात टॉप टू बॉटम क्षेत्रातील लोक twitter वर असतात त्यामागचे एक कारण म्हणजे tweet करताना टवीट्ची मर्यादा १४० एवढी नेमकी असते.म्हणजेच अगदी थोडक्यात नेमकेपणा आणण्याचा प्रयत्न होतो
लोकांना वाचण्यासाठीही छान वाटते.तसे पाहिले तर १४० अक्षरांत tweet परिपूर्ण होत नाही अशी सर्वांचीच ओरड असते पण tweet चे २-३ (हवे तेवढे) भाग करून आपल्याला ते tweet परिपूर्ण बनवता येऊ शकते.असो

         मी माझ्या मागील लेखात twitter trend म्हणजे काय असते? या बद्दल संपूर्ण पोलखोल केली होती.आता थोडे वेगळ्या मार्गाने थोडक्यात पाहू.....आपण हैश टैग न वापरता करत असलेल्या tweets पेक्षाही #टैग वापरून केलेले तुमचे tweet तुमचे followers नसलेलेही लाखो लोक पाहू शकतात. उदा. #मराठी काहीतरी ट्वीट ले तर #मराठी वर क्लिक करताच मराठी हा शब्द असणारे हजारो tweets आपण पाहू शकतो.म्हणून आपली चर्चा ठराविक विषयाभोवतीच् ठेवण्यासाठी हैशटैग/ट्रेंड हा concept twitter ने सुरु केला आहे याला जगभरातून प्रचंड प्रतिसादही मिळतो आहे खरेतर ट्रेंड हाच twitter चा अविभाज्य घटक आहे. म्हणून सर्व दिग्गज लोक/संस्था promoted(पैसे देवून) ट्रेंड करतात व स्वतः चे किंवा व्यवसायाची वृद्धी करतात.
      
       आता बोलुयात मराठीबद्दल! जगात हजारो भाषा बोलल्या जातात त्यामध्ये सर्वात जास्त मराठी बोलणाऱ्या भाषांत मराठीचा १५ वा क्रमांक लागतो खरंतर ही मराठी लोकांसाठी खुप अभिमानाची बाब आहे नाही का? संत परंपरा लाभलेली। आपली मराठी संस्कृती फारच महान आहे.या। मायमराठी भूमीत आतापर्यंत कला,क्रिड़ा,सांस्कृतिक,राजकारण,समाजकारण,पर्यटन,गड-किल्ले इ. सह बऱ्याच बाबींचा समावेश होतो! एवढ्या मोठ्या लोकांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्राला/मराठी संस्कृतीला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर किती कमी स्थान आहे किंवा हव्या त्या प्रमाणात त्या बाबी लोकांना माहिती नाहीत ही बाब जरा कमीपणाचीच वाटते नाही का?


      खरे बोलायचे झाले तर मराठी एवढी श्रेष्ठ भाषा असताना मराठी लोकांच्या एकमेकांच्या पायात पाय घालून मागे खेचण्याच्या स्वभावामुळे आपण मागे आहोत जसे प्रत्यक्ष जगताना एखाद्याला मागे खेचून आपलेच घोडे दामटवले जाते अगदी तसेच social media वर सुद्धा खुप खेचाखेचीचे प्रमाण कमी नाही...परवाच्या २७ फेब्रुवारीच्या
मराठीराजभाषादिनलाही तेच घडले! एकमेकांच्या मराठी हेव्यादाव्यांमुळे twitter वर तब्बल ३-४ ट्रेंड झळकले
आणि मराठी झेंडा मानाने जगभरात डोलवण्याची संधी 
घालवली त्यामुळे worldwide trend सोडाच् पण भारताच्या टॉप १० मध्येही स्थान नाही मिळवू शकला एकही मराठी ट्रेंड!  trendmap.com आणि topsy.com या संकेतस्थळावरून माहिती घेतली तर #मराठीदिन #अभिजातमराठी #मायमराठी या तिन्ही ट्रेंड्स मध्ये सहभागी झालेले यूज़र्स व ट्वीटल्या गेलेल्या एकूण ट्वीट्स लक्षात घेतले तर भारतातील त्यादिवशीचा नंबर १ तर जगातील नंबर ३ ट्रेंड बनला असता आणि मराठीचा झेंडा जगाच्या अटकेपार रोवला गेला असता!एवढी प्रचंड ताकद मराठी माणसांत नक्कीच असताना अशी बंडखोरी का? माझे एवढेच म्हणणे आहे
थोडासा आदर्श तमिल जनतेकडून घ्यायला हवा! कारण मराठी दिनाच्या ४-५ दिवसच अगोदर #जयतमिळ (तमिळ भाषेत बरं का!) हा जागतिक पातळीवरील ट्रेंड 
बनवून सर्वच क्षेत्रातील लोकांनी सहभागी होऊन
 कमालीची एकजुट दाखवली आणि तमिळ सातासमुद्रापलीकडे पोहोचवली! याला म्हणतात एकजुठ!
 
   याउलट एरवी मराठी भाषेचे पडद्यावर,टीवीवर,भाषणात
 गोडवे गाणारे दिग्गज लोकं, राजकारणी नियोजित हैशटैग वापरून ट्वीट करा अशी विनंती करूनही मुद्दामहुन  जुमानत नाहीत ! ही दुर्दैवाची बाब! बदलायला हवे हे सर्व नाही का?
माझे मराठीबद्दल फार प्रेम उतू जायला लागले आहे अशातला हा भाग मुळीच नाही पण मी वस्तुस्थिती कथन केली!

शेवटी माझ्या आकलनानुसार अगदी थोडक्यात सांगतो 
ट्विटर ट्रेंड्स च्या माध्यमातून आपली मायमराठी भाषा,
संस्कृती जगपातळीवर झळकवण्यासाठी मराठी लोकांनी
अशा मराठी ट्रेंड्स उपक्रमात वेगळी चुल न मांडता एकीचे। दर्शन घड़वावे हीच अपेक्षा, कारण देशपातळी-जगपातळी
वर  मराठी संस्कृतीचा झेंडा सहजरित्या उंच डोलवायचा असेल तर 'ट्विटर ट्रेंड' हेच आजघडीचे सर्वात प्रभावी माध्यम आहे
ही वस्तुस्थिती आहे....धन्यवाद!

Gopal Madane
Twitter -> @madanegopal
www.gopalmadane.blogspot.in
         

स्वत:चे ब्लॉगस्पॉट संकेतस्थळ कसे सुरू कराल?

मला आठवतंय शाळेत असताना “माझी रोजनिशी” नावाचा एक धडा होता,त्यात रोज घडणार्‍या बाबी त्यात लिहून काढणे हा त्या मागचा उद्देश ज्यातून आपल्या चु...