मला आठवतंय शाळेत असताना “माझी रोजनिशी” नावाचा एक धडा होता,त्यात रोज घडणार्या बाबी त्यात
लिहून काढणे हा त्या मागचा उद्देश ज्यातून आपल्या चुका सुधारणे हा यामागचा उद्देश असावा/होता.
डिजिटल इंडियाच्या या युगात ब्लॉग लिहिण्याचा जमाना जमाना सुरू झाला आहे असे म्हटले तर वागवं ठरू नये.सध्या विज्ञानाने
केलेली प्रगती म्हणजेच computer,tabs,handsets,e-learningच्या जमान्यात कागदावर आठवणी,लेख,माहिती वगैरे
लिहून ठेवण्याचा प्रकार जवळपास बंदच होत चालला आहे आणि गेल्या ६-७ वर्षापासून blogspot
आणि wordpress यांनी
चांगलेच पाय रोवायला सुरुवात केली आहे.
Ø काही
प्रश्न :
v ब्लॉगस्पॉट
म्हणजे काय?यासाठी कोणत्या बाबींची आवश्यकता
असते?
v ब्लॉगस्पॉट
अथवा वर्डप्रेसला एवढे महत्व का प्राप्त झाले आहे?
v ई-मेल
आयडीशिवाय आपण आपले ब्लॉगस्पॉट संकेतस्थळ सुरू करू शकतो का?
v ब्लॉगस्पॉट
एंट्रीज,ब्लॉगिंग,ब्लॉगर
डॅशबोर्ड म्हणजे काय?
v ब्लॉगस्पॉट
टेंप्लेट कशी सेट कराल?
v ब्लॉगस्पॉटचा
नक्की कुठे व कसा वापर होतो?यातून स्वत:ची वेबसाइट बनवणे
शक्य आहे?
यासह आपल्या मनातील काही प्रश्न ज्यावर आपण प्रकाश
टाकू .......
ब्लॉग हे वेबलॉग या शब्दाचे
लघुरुपांतर आहे. हा संकेतस्थळाचाच म्हणजे वेबसाईटचाच प्रकार आहे. ब्लॉग हे एक व्यक्ती किंवा व्यक्तिंचा समूह ब्लॉग निर्माण करू शकतो. ब्लॉगमध्ये मजकूर, व्हिडीओज, ऑडिओज, चित्रे आणि वेबलिंक्स दिलेले असतात. नविन मजकूर ब्लॉगवर लिहिणे किंवा प्रकाशित करणे याला 'ब्लॉगिंग' असे म्हणतात. ब्लॉगवरील लेखांना 'ब्लॉगपोस्ट' 'एन्ट्रिज' म्हणतात. ब्लॉग लिहीणा-या लेखकांना ब्लॉगर म्हणून संबोधले जाते. आज ब्लॉगवर कोट्यावधी लेख नविन ब्लॉग वेबवर झळकत आहेत.
१.
स्वत:चा ई-मेल आयडी
२. संगणक
किंवा हँडसेट
३. इंटरनेट
वरील ३ गोष्टी उपलब्ध असतील तर ब्लॉग तयार करण्यासाठी काही अडचण येणार नाही फक्त ५-१० मिनीटात तुमचा ब्लॉग तयार होईल.ईमेल नसेल तर ब्लॉगस्पॉट आपण तयार करू शकत नाही.
सर्वप्रथम आपल्याकडे gmail नसेल तर बनवून घ्या..
Log in केल्यानंतर Bogger Dashboard open होईल.
blogger dashboard वर New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल
उदा.....
वरील विंडोजमध्ये तुम्हाला ब्लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल उदा.my blogs, When GM Thinks…. etc
Address मध्ये तुमच्या ब्लॉगला तुम्ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्या नावाने अड्रेस तयार करता येईल. उदा.gopalmadane.blogspot.in ,marathibrain.blogspot.in इ.
तुम्ही तुमचा हवा तो blog address टाईप केल्यानंतर तो उपलब्ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्ध नसेल तर "sorry this blog address is not available " म्हणून त्या खाली मेसेज दिसेल,मग अशावेळी दुस-या नावाने प्रयत्न करा उपलब्ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल तर सर्वात खाली दिसणा-या Create blog वर क्लिक करा तुमचा ब्लॉग तयार होईल.
ब्लॉग
तयार केलेला ब्लॉग डॅशबोर्डवर दिसू लागेल. त्याच्या खाली एक मेसेज दिसेल Start posting वर क्लिक करा किंवा पेन्सिलचा चित्र दिसत आहे त्यावर क्लिक करा ब्लॉग पोस्टींगचा विंडो उघडेल .....
वरील ब्लॉग पोस्टच्या विंडोमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी महत्वाच्या आहेत Post समोरील चौकोनात ब्लॉगचा Title लिहा खाली मोठा स्पेस दिसेल त्यामध्ये तुमचे विचार , मुद्दे , चित्रे आणि लिंक्स तयार करु शकता लेख पूर्ण झाल्यानंतर उजव्या बाजूला दिसणा-या Publish वर क्लिक करा त्यापूर्वी save करूनही ठेऊ शकता,पब्लिश करण्यागोदर previewसुद्धा पाहू शकता,नंतर तुमचा लेख blogspotवर प्रकाशित होईल तेही कोणत्याही प्रकाशकाशिवाय! आहे न गंमत!
थोडक्यात काय या डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग साधारणपणे
स्व:विचार,कविता,कथा,चारोळया,साहित्य,पुस्तकांचे
जतन,ऑडिओ,विडियो
जतन,स्वत:ची वेबसाइटनिर्मिती व यातून व्यवसाय वृद्धी
यासाठी प्रामुख्याने होत असतो.तुम्ही तुमच्या ब्लॉगस्पॉटची डिजाइन कधीही बदलू शकता,यापुढेही जाऊन सांगायचे म्हणजे काही रक्कम खर्चून स्वत:ल हवे ते डोमेन नेमही तुम्ही निवडू शकता. उदा. marathibrain.org ,gopalmadane.com आणखी काय हवे!!
blogspot सुरू करताना आणखी काही अडचण आली तर निसंकोचपणे विचारा.
मी blogspot किंवा wordpressच्या सहाय्याने एक sample manually html website बनवतोय ती कशी मी बनवली आणि तुम्ही कशी बनवू शकता हे सगळे मी बनवल्यानंतर ब्लॉग रूपात नक्की ठेवेन.
मी blogspot किंवा wordpressच्या सहाय्याने एक sample manually html website बनवतोय ती कशी मी बनवली आणि तुम्ही कशी बनवू शकता हे सगळे मी बनवल्यानंतर ब्लॉग रूपात नक्की ठेवेन.
Twitter @madanegopal
madanegopal@gmail.com
धन्यवाद गोपाल! छान माहिती दिलीस.
उत्तर द्याहटवासुंदर!
उत्तर द्याहटवाThank you!!
उपयोग झाला राव Actually I'm trying to find information about how to handle blogger in google but you give this in form ofआपल्या मराठी मध्ये Ty #Bhai😘😘
उत्तर द्याहटवाI will try Gopal to create New blog
उत्तर द्याहटवा