मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

असा ट्रेंडला जातो ट्विटर ट्रेंड....काही टिप्स


नमस्कार , मागील दोन लेखात मी ट्विटर ट्रेंड्स बनतो तरी कसा याबाबतीत पोलखोल केली होती तर दुसऱ्या लेखात ट्विटर ट्रेंड हा मराठी संस्कृतीला कसा अटकेपार नेऊ शकतो हे पाहिले!

  दररोज जगाच्या कानाकोप्-यातून हजारो ट्रेंड्स बनत असतात आणि 210+ देश असणाऱ्या या  जगातून
असंख्य ठिकाणी लोकल/ग्लोबल ठिकाणी ट्रेंड्स बनत असतात.
कैलिफोर्नियात सर्वर लोकेशन असणाऱ्या या ट्विटरने भारतातील तब्बल सर्वात मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या
10+ भारतीय भाषा ट्रेंडसाठी खुल्या केल्या आहेत! याला  ट्विटरबद्दल वाढणारे भारतीयांचे वाढते आकर्षण व ट्विटरसाठी भारत ही सर्वात मोठी  बाजारपेठ असणे या बाबी कारणीभूत आहे

आता या लेखात ट्विटर ट्रेंड कोणकोणत्या बाबी महत्वपूर्ण ठरतात हे पाहुयात.....

आजकाल आपण पाहतो काही ट्रेंड्स ठरवून केले जातात तर काही ट्रेंड्स आपोआप बनतात तर काही
 ट्रेंड्स पैसे देऊन (promoted) बनवले जातात ,असो!

forums.digitaspy.co.uk , trendmap.com , topsy.com , hello@jungle.media.com  या ट्विटरवर survey करत असणाऱ्या संकेत स्थळांच्या तपशीलानुसार/सर्वेनुसार
ट्विटर ट्रेंड बनवताना काही अत्यावश्यक टिप्स
खालीलप्रमाणे...

(1) ट्विटर ट्रेंड करताना नक्की कोणता शब्द ट्रेंड करायचा हे निश्चित करा.

(2) तुमचा ट्रेंड बनवण्याचा 2-3 तासांचा वेळ निश्चित करा
याने भरपूर यूज़र्स एकत्र सहभाग नोंदवतना  वेगात भरपूर ट्वीट्स ट्विटर सर्वर लोकेशनवर सेव होतात याने
 ट्रेंड वेगात उसळी घेतो व काही मिनिटांत तो लिस्टमध्ये दिसू लागतो.
लक्षात घ्या तुम्ही दिवसभर ट्वीटिंग करत बसण्यापेक्षा
ठराविक वेळेत tweets पोस्ट करा निश्चित फरक पडतो

(3)  तुमच्या ट्वीट्स किती झाल्या यापेक्षा जास्तीत जास्त किती लोकांकडून तो हैशटैग mentain झाल्या यावर  twitter trend चे गुणोत्तर अवलंबून असते.

(4) verified अकाउंटवरुन त्या हैशटैगचा ट्वीट आल्यास जास्तीत जास्त लोकांनी त्याला retweet करणे  व तो  ट्वीट टॉप लिस्टमध्ये पोहोचवणे  अत्यंत आवश्यक आहे.

(5) याशिवाय 1k+ ,2k+, 3k+, 4k+, 5k+, 6k+......10k, 15k+ ........followers आहेत यांचा सहभाग सर्वात महत्वाची भूमिका बजावतो कारण अशांच्या ट्वीट्स मधूनच् टॉप ट्वीट्स बनतात ज्या खुप महत्वाच्या  भूमिका बजावतात!

(6) top tweet म्हणजे ज्या हैशटैग असलेल्या ट्वीटला  जास्तीत जास्त retweet मिळतात अशा ट्वीट्स.

(7) जर किमान 5 ते 10 वेगवेगळ्या वापरकर्त्याच्या tweets ना 30+, 40+ .....retweets आल्यास त्या ट्रेंड्सचा trend rate झपाट्याने वाढतो.

(8) आणखी एक बाब म्हणजे जो हैशटैग आपण ट्रेंड बनवत आहोत तशा नमूद असणाऱ्या ट्वीट्स retweet मारणे. उदा. #महाराष्ट्रदिन हा ट्रेंड बनवताना ज्या ज्या ट्वीट्समध्ये #महाराष्ट्रदिन हा शब्द नमूद आहे तो tweet हा सर्वांनीच retweet मारणे आवश्यक आहे.

(9) अर्थात त्या ट्रेंडच्या mentain ला (उदा. #महाराष्ट्रदिन) दुसऱ्याने RT दिला तर तो RT मारलेला tweet ट्विटर ट्रेंड server मध्ये fresh/नविन ट्वीट म्हणूनच मोजला जातो.

(10) लक्षात ठेवा ट्विटर ट्रेंड ठराविक वेळेतच बनतो उदा. क्रिकेट मैचचे ट्रेंड अवघ्या 25-30 min बनतात !त्याला कारणही तसेच आहे हा खेळ संपूर्ण भारतात प्रचंड लोकप्रिय आहे त्यामुळे हजारो लोक ट्रेंड वर्ड mentain करून आपल्या प्रतिक्रिया सामना चालू असतानाच नोंदवायला सुरवात करतात आणि बघता बघता ट्रेंड उसळी घेत  टॉपवर पोहोचतो.

(11) तसेच TV चॅनेल्सचे राजकारण किंवा चालू घडामोडींवर ट्रेंड्स लगेच activate होतात कारण TV स्क्रीनवर सतत अमूकअमूक हैशटैग वापरा व तुमच्या प्रतिक्रिया कळवा असा msg स्क्रीनवर सतत फ़्लैश होत असतो लाखो लोक हे पाहत असतात मग हजार-पाचशे लोकांनी सहभाग नोंदवताच ट्रेंड लगेच उसळी घेत  टॉप लिस्टमध्ये झळकतो अर्थात ट्रेंड बनवताना न्यूज़ चैनल्स महत्वाची भूमिका बजावतो !
(12)याशिवाय राजकारण/समाजकारण /खेळाडू/ सिनेसृष्टीतील लोकांनी सहभाग नोंदवताच बरेच चाहते त्यांचे अनुकरण करतात याने एकूण सहभाग वाढतो व  ट्रेंड लगेच  झळकतो.

(13) जगात रोज क्षणाक्षणाला असंख्य घटना घडत असतात मग यावर असंख्य प्रतिक्रिया येतात  असे अनेक ट्रेंड आपोआप टॉप लिस्टमध्ये  झळकतात.

(14) भारतात रोज वरच्या स्थानी राहणाऱ्या ट्वीट्सच्या ट्रेंड्सची सरासरी 600-800 वेगवेगळे(unique) यूजर्स अंदाजे 1800+  unique ट्वीट्स हे गुणोत्तर बनले आहे(trendmap.com ची  आकडेवारी)
अर्थात  हे गुणोत्तर रोजरोज घडणाऱ्या घटनांवरून
किंचितसे बदलत असते!

(15) तर जगातील अर्थात worldwide top 5 ट्रेंड्ससाठी अंदाजे किमान 2500+ यूजर सहभाग नोंदवला जातो!(trendmap.com व hello@jungle.media.com यांची आकडेवारी)

(16)अर्थात अपेक्षित tweets चा पल्ला  सहज पूर्ण होतो  पण अपेक्षित सहभाग वाढणे अत्यावश्यक.



(17) तुम्हाला टॉप 35 ट्रेंड्स पाहायचे असतील तर trendmap.com या संकेतस्थळ उपलब्ध आहे याशिवाय ट्रेंडसंबधित सर्व माहिती ट्वीट्स रेट, एकूण mentions, top tweets, most fav.tweets, इतर ट्वीटर ट्रेंड्सशी तुलना यासह खुप बाबी येथे उपलब्ध होतात पण  तुम्ही trendmap.com ला registered असणे अत्यावश्यक आहे.

(18) याव्यतिरिक्त topsy.com हे संकेतस्थळ सुद्धा सर्वांना खुले आहे आपण सहज analysis करू शकता!

शेवटी एवढंच , ट्विटर ट्रेंड बनवणे एक प्रतिष्ठा/फैशन बनली आहे!

वरील माहिती मी शक्य तेवढी तंतोतंत देण्याचा प्रयत्न केला  असून यासाठी मला  google ची मोलाची साथ मिळाली तर अजून नेमकेपणा आणण्यासाठी
forums.digitaspy.co.uk , trendmap.com , topsy.com , hello@jungle.media.com या ट्विटरशी संबधित संकेटस्थळांवरही बहुमूल्य माहिती मिळाली!

धन्यवाद !  #happy_tweeting

स्वत:चे ब्लॉगस्पॉट संकेतस्थळ कसे सुरू कराल?

मला आठवतंय शाळेत असताना “माझी रोजनिशी” नावाचा एक धडा होता,त्यात रोज घडणार्‍या बाबी त्यात लिहून काढणे हा त्या मागचा उद्देश ज्यातून आपल्या चु...