भारत सरकारने डिजिटल इंडिया ही संकल्पना सुरु करून भारताला काही प्रगत देशांच्या रांगेत नेऊन ठेवले.
सतत चर्चेत असणारा हा डिजिटल इंडिया काय प्रकार आहे बरं? यापेक्षाही मला वैयक्तिक आवडलेला प्रकार म्हणजे 'डिजिटल लॉकर' आणि याचविषयी आपण
थोडक्यात माहिती घेऊ,त्यापूर्वी सर्वांच्या मनात असणारे काही काही प्रश्न....
(1) डिजिटल इंडिया म्हणजे काय?
(2) आपली लाइफ डिजिटल होणार म्हणजे नक्की काय होणार?
(3) डिजिटल इंडिया ही संकल्पना का आणली गेली?
(4) हा 'डिजीटल लॉकर' काय प्रकार आहे?
(5) या डिजिटल लॉकर लॉकर साठीचे सुरक्षित संकेतस्थळ आहे का?
(6) डिजिटल लॉकर संकेतस्थळला मोबाइलचा वापर करून दस्तऐवज स्टोअर करू शकतो का?
(7) साधारण किती कागदपत्रे आपण स्टोअर करू शकतो? याला स्टोरेज मर्यादा आहे का?
(8) आधार क्रमांक नसेल तर तुम्ही डिजिटल लॉकरचे अकाउंट काढू शकता का?
(9) जर आधार कार्ड असेल पण मोबाइल नंबर आधारला लिंक नसेल तर password create होताना येणाऱ्या समस्येला दूसरा मार्ग आहे का?
(10) डिजिटल लॉकर फक्त विद्यार्थ्यांसाठीच आहे का?
(11) डिजिटल लॉकर स्टोअर केलेल्या कागदपत्रांची सत्यता कशी तपासणार?
(12) या डिजिटल लॉकरला पूर्वीच्या किचकट इ-साइनिंग यूएसबी डॉगल पद्धतीने आहे की आणखी काही?
(13) ही डिजिटल लॉकर पद्धत कितपत यशस्वी ठरणार?
असे असंख्य प्रश्न तुमच्या आमच्या मनात पडले असतील...या सर्व बाबींची उत्तरे एकत्रीत पाहण्याचा प्रयत्न करू...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'डिजिटल इंडिया सप्ताह' नुकताच पार पडला,खऱ्या अर्थाने भारताने एक पाऊल पुढे टाकले असे आपण म्हणू शकतो याला कारण असे की देशातील लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांचेच जीवन डिजिटल व्हायला सुरुवात होणार आहे! या डिजिटल इंडियाने सर्वांचेच जीवन अद्ययावत होणार, मतदान प्रक्रिया ऑनलाइन होणार यावर एक समिती लवकरच हिरवा कंदील दाखवेल, शेतकऱ्यांना त्याच्या मालाचा भाव ऑनलाइन बाजारपेठेमुळे स्वतः ठरवता येणार,म्हणजेच संबधीत संकेतस्थळांवर शेतकरी जगातील बाजारपेठांच्या भावाची तुलना करूनस्वतः किंमत ठरवून हव्या त्या ठिकाणी आपला शेतमाल विकू शकणार! म्हणजेच दलालांच्या जाचातुन बळीराजाची मुक्तता! मतदान कार्डशी आधार क्रमांक जोडला जाणार याने दुबार/बोगस मतदार सापडणार म्हणजेच पर्यायाने मतदान प्रक्रियेत पारदर्शकता येणार! सर्व ग्रामपंचायती/नगरपालिका ऑनलाइन होणार याने प्रशासन व गावाचा थेट समन्वय साधून विकासाला चलना मिळणार! ऑनलाइन एप्लीकेशन देताच RTO कडून लायसन्ससाठी परीक्षा देता येणार,इथेही दलालांपासून मुक्ती! संपूर्ण देशात लवकरच व्यापाऱ्याना एकच ऑनलाइन करप्रणाली येणार! एवढंच काय संपूर्ण भारतासाठी एकच टोलटॅक्स,वर्षातून एकदाच ठराविक रक्कम भरा आणि संपूर्ण भारतभर प्रवास करा,यासाठी स्मार्ट कार्डची कल्पना प्रस्तावित आहे,भारतातील सर्व धार्मिक स्थळे,पर्यटन स्थळे ऑनलाइन जोडली जाणार!
थोडक्यात काय सर्वाच्या सर्व बाबी ऑनलाइन
जोडल्या जाऊन भारताला जगात प्रगत राष्ट्रांत नेऊन ठेवण्यासाठी एक कौतुकास्पद प्रयत्न होयोय....असो
डिजिटल इंडिया या प्रकारातील मला वैयक्तिक आवडलेला सर्वात छान बाब म्हणजे 'डिजिटल लॉकर'
हा प्रकार मला एवढ्यासाठी खास वाटतो की
याने शिक्षितांना नोकरीच्या मुलाखतीसाठी फाइल वागवत बसावे लागणार नाही कारण सर्व कागदपत्रे डिजिटल लॉकर संकेतस्थळावर स्टोअर असेल...मस्त आईडिया आहे ना! या डिजिटल लॉकरला 'डिजिलॉकर' असेही म्हणतात बरं का! कुलुप? हो...आणि हे कुलुप/लॉकर याची किल्ली तुमच्याकडे हवीच!!
नक्की काय आहे डिजिलॉकर? बघुयात?
डिजिलॉकर ही एक वेबसाइट आहे जिथे महत्वाचे दस्तऐवज, कागदपत्रं ठेवायची मोफत सोय भारत सरकारने केली आहे.
ही सुविधा फक्त विद्यार्थांसाठीच आहे का? तर नाही... प्रत्येक शिक्षित व्यक्ती digilocker सुविधेचा फायदा घेऊ शकतो... शिक्षण किंवा नोकरी यासाठी आपल्याला महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावीच लागतात,कुठे अर्ज भरताना पळापळ करून अनेक कागदपत्रं जमवावी लागतात वोटर आयडी,पासपोर्ट,विविध दाखले,पैनकार्ड याची झेरॉक्स कॉपी करा नंतर ती ट्रू कॉपी करा या सर्व कटकटीवर रामबाण उपाय म्हणजे डिजिटल लॉकरवर अकाउंट काढणे! काय कराल?
(a) तुम्हाला डिजिलॉकर वापरण्यासाठी https://digitallocker.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
(b) तुम्हाला आधार क्रमांक हा अनिवार्य
आहे शिवाय आधारला जोडलेला मोबाइल नंबरही असावाच!
(c) तुम्ही वरील संकेतस्थळावर आधार कार्ड व मोबाइलवर आलेला OTP (one time password) वापरून लॉगीन करू शकता.
किंवा तुमचा जर मोबाइल नं आधारशी लिंक नसेल
तर मात्र तुम्हाला थम्ब पध्दत वापरावी लागेल त्यावरून यूजर नेम व पासवर्ड सेट होईल.
(d) एंड्रॉइड फोन धारकांसाठी 'Digilocker App' google प्लेस्टोरमध्ये उपलब्ध आहे त्यावरूनही digilocker अकाउंट शक्य आहे तत्पूर्वी तुम्हाला तुमची सर्व महत्वाची कागदपत्रे अगोदर स्कैन
करून घेणे आवश्यक आहे.
(e) तुम्ही स्कैन केलेली महत्वाची कागदपत्रे, वोटर कार्ड,पैन कार्ड,मार्क शीट्स, जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,डोमासाइल सर्टिफिकेट,इनकमटॅक्स रिटर्न्स इ. सह अनेक सर्व प्रकारची महत्वाची कागदपत्रे डिजिलॉकरवरती स्टोअर करू शकता.
(f) डिजिटल लॉकरचा स्टोरेज क्षमता 10 MB आहे, एवढ्या जागेत बरीच कागदपत्रे स्टोअर होऊ शकतात
भविष्यात 1 GB पर्यंत ही क्षमता वाढणार आहे!
(g) या लॉकरमध्ये कागदपत्रे ठेवली की त्या प्रत्येक महत्वाच्या दस्तऐवजांसाठी तुम्हाला एक लिंक मिळेल, सध्या अनेकजण बरेच फॉर्म्स ऑनलाइन भरतो.हळूहळू या फॉर्म्समध्ये तुमच्या दस्तऐवजासाठी स्कैनप्रतीऐवजी फक्त ही लिंक पोस्ट केली की त्या त्या संस्थेला किंवा शासकीय कार्यालयाला तुमच्या दस्त ऐवजाचा एक्सेस मिळेल.
(h) महत्वाचे म्हणजे डिजिटल लॉकरवर वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांनी जारी केलेल्या दस्तऐवजांची एक यादी असेल ज्याने आपल्या कामासाठी नक्की काय कागदपत्रे लागतील हे कळेल, अर्थात आपली अडवणुक टळेल.
(i) इतकेच काय तुम्ही नोकरीचे विविध फॉर्म्स भरताना
कोणकोणत्या शासकीय कार्यालयांना तुम्ही तुमच्या दस्तऐवजांचा एक्सेस दिला आहे याची यादी तुम्हाला इथे पाहता येईल.
(j) डिजिटल लॉकरमधील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ई-साइनिंग (e-signing) डिजिटल सिग्नेचर!
ऑनलाइन फॉर्मस भरताना बऱ्याचदा आपली डिजिटल सिग्नेचर बऱ्याच फॉर्म्स् वर आवश्यकता असते, कारण पूर्वीची E-Signing पद्धत किती किचकट आहे आपण जाणतोच.आपल्याला इ-सिग्नेचर करताना आपल्याला इश्यू केलेला एक यूएसबी डॉगल जोडल्याशिवाय sign करताच येत नाही म्हणजे डॉगल वागवत न्यायची कटकट आलीच...:-( पण डिजिटल लॉकरने हा प्रॉब्लम सोडवला आहे अर्थात डिजिलॉकरमध्ये डॉगल वापरायची गरज उरणारच नाही... आहे ना चांगली बातमी
>> "Digital Locker च्या काही मर्यादा"
(a) ही योजना जरी वेळ वाचवणारी असली तरी ग्रामीण भागात इंटेरनेट सुविधा योग्य पद्धतीने नसल्याने
शहरात येऊन साइबर कॅफेचा वापर करावा लागतोय.
बाब खर्चिक आहे.
(b) digilocker पूर्णता यूजर फ्रेंडली आहे,मोबाइल वरूनही तुम्ही तुमचे अकाउंट काढू शकता पण आपली scanned डॉक्युमेंट्स स्टोअर करायची असल्याने जिथे scanner मशीन जिथे असेल तिथुनच scan करून त्याची सॉफ्टकॉपी जवळ असणे अनिवार्य आहे.
(c) आधारशी बऱ्याच लोकांचे मोबाइल नंबर न जोडले गेल्याने OTP जाण्यास पर्यायाने अकाउंट तयार व्हायला अडथळे येताहेत.
>> "डिजिटल लॉकर पद्धत खरच सुरक्षित आहे"
(1) digilocker ही भारत सरकारची सुविधा असल्याने व तज्ञ अभियंत्याच्या टीमने हे संकेतस्थळ बनवले असल्याने
गूगल ड्राइव, माइक्रोसॉफ्ट वन ड्राइव किंवा ड्रॉप बॉक्स यासारख्या खासगी आणि परदेशी सेवांपेक्षा नक्कीच अधिक
सुरक्षित आहे.
(2) आधार लिंक जोडली गेल्याने ज्याप्रकारे मोबाइल बँकिंग सुविधा सुरक्षित आहे त्याचप्रकारे ही सुविधा अ
धिक सुरक्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
शेवटी थोडक्यात काय माहिती तंत्रज्ञानात जगातील
काही राष्ट्रांनी खुप मोठी प्रगती केली मग सुरु झालेल्या डिजिटल इंडिया पर्वात सर्वांनी सहभागी व्हावेच लागणार आहे त्यासाठी डिजिटल होत चाललेल्या या देशात ही नवीन घडामोड़ आपल्याला महितीच पाहिजे म्हणून प्रत्येक शिक्षित व्यक्तीने डिजिलॉकरचे खाते
काढणे गरजेचे आहे कारण ही काळाची गरज आहे किमान त्यामुळे तरी आपली कागदपत्रं एका जागी राहू शकतील... नाही का?
मला मिळालेल्या माहितीनुसार डिजिटल लॉकरला सर्वात जास्त प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळतोय पहिल्याच आठवड्यात 1 लाख+ लोकांनी डिजिलॉकर अकाउंट उघडले आहे,म्हणजेच आपले मराठीजन नक्कीच याबाबत सकारात्मक आहेत ही आनंदाची व सकारात्मक बाब आहे.
सदर लेख तमाम मराठी जनतेला बहुचर्चित व महत्वाचा
डिजिटल लॉकर हा मुद्दा व्यवस्थित समजावा यासाठी ही थोडीशी खटपट... धन्यवाद :)
प्रतिक्रिया कळवा
Twitter @madanegopal
www.gopalmadane.blogspot.in
madanegopal@gmail.com
धन्यवाद गॊपाळसर, अत्यंत महत्वपूर्ण अशी टॆक्निकल माहिती तुम्ही साध्या ,सरळ आणि सर्वांना समजेल अशा शब्दांत तुम्ही मुद्देसुद पणे मांडली आहॆ!
उत्तर द्याहटवासर्वच मुद्दे माहितीपूर्णच आहॆत, "दलालांच्या जाचातून बळीराजा मुक्त हॊणार" हा मुद्दा खुपच भावला!
पुनःश्च धन्यवाद!
thanks sir :)
उत्तर द्याहटवाछान माहिती रे...!!
उत्तर द्याहटवा(यावरून आठवलं की माझं आधार कार्ड काढायच राहिलय अजुन. लवकरच काढायला पाहिजे आता 😊)
thnx akshay...मग काढून घे की आधार कार्ड लवकर :)
उत्तर द्याहटवाVery nice Gopal sir . Firstly thanks to you for sharing such valuable thing to us. In very brief manner you have explained the "Digital Locker ". This will very beneficial for me and others also. Good explanation and streamline flow of information is very impressive.
उत्तर द्याहटवाVery good. Thanks and I am further seeking for your next blog.
thanks sagar...:)
उत्तर द्याहटवाswagat aahe tuz bhau. ashich mahit det ja.
हटवा