शनिवार, ९ एप्रिल, २०१६

#गुढीपाडवा ट्रेंड उत्सव: एकवटलेल्या मराठी माणसांची कमाल! (Statistic/आकडेवारी)




    #गुढीपाडवा उत्सव यावर्षी ट्विटरवर जोरात झाला,मराठी हि प्रादेशिक भाषा असूनही एकवटलेल्या मराठी माणसामुळे #गुढीपाडवा या hashtag ने भारतात दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारून सातासमुद्रापार #गुढीपाडवा या मराठी उत्सवाचा झेंडा रोवला!  त्यामुळे मराठी माणसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच!
       Twitter वर १७ मार्च २०१६ रोजीच @marathibrain हॅंडलवरून ट्विट करून आपल्याला यंदा म्हणजे ८ एप्रिलला #गुढीपाडवा डिजिटल स्वरूपात साजरा करून या मराठी संस्कृती/उत्सवाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हे या मागचे उद्दिष्ट होते तसे
आवाहन करण्यात आले होते मराठी लोकांनी त्या Tweetला Retweet, like, reply देत मोठा प्रतिसाद दिला होता तेव्हाच लक्षात आले होते मराठी माणूस एकवटतोय आणि झालेही तसेच, अखेर तो दिवस आला ८ एप्रिल!
 रात्रीच्या १२ वाजल्या आम्ही @marathibrainच्या माध्यमातून #गुढीपाडवा hashtag वापरण्याचे आवाहन पुन्हा केले
व स्वतः ही गुढीपाडवा hashtag वापरायला/quote करायला,RT करायला सुरुवात केली.... मराठी माणसाने एखादी गोष्ट उराशी बाळगली तर तो हट्टाने पेटतो मग त्याला कुणीही रोखू शकत नाही हे अनेकवेळा आपण पाहिलेलं आहे,आणि मराठी गुढीपाडव्याची झलक भल्या मध्यरात्री सुरु झाली, लोकं मराठी,हिंदी,इंग्रजीत शुभेच्छा देतानाही hashtag #गुढीपाडवा वापरू लागली आणि काही क्षणात सगळ्यांच्या Timeline वर फक्त #गुढीपाडवा hashtag च्याच ट्विट्स दिसू लागल्या....
सगळीकडे #गुढीपाडवा #गुढीपाडवा #गुढीपाडवा..... परिणाम १२:५० am लाच पुण्यात हा ट्रेंड ब्रेकिंग रुपात पहिल्या स्थानी दिसू लागला,काही मिनिटात मुंबईतही अव्वलस्थानी पोहचला हुश्श...
आत्मविश्वास दुणावलेल्या मराठी लोकांनी
वेगात सर्वांना ट्वीट्स करण्यासाठी सामील करून घेतले आम्ही trendmapच्या संकेतस्थळाला भेट दिली पण तत्पूर्वीच #गुढीपाडवा ने सर्व्हरमध्ये जागा
निश्चित करून(space allocation) भारतात चौथ्या स्थानी झेप घेतली होती साधारण ०१:३२ झाले होते! ट्रेंड झटक्यात होण्याचं आणखी एक
महत्वाचे कारण म्हणजे ट्विटर ट्रॅफिक अतिशय हळू होते आणि भल्या रात्रीही आपला मराठी माणूस जोरात होता!

          बघता-बघता ४थ्या स्थानावरून १६व्या स्थानावर फेकला गेलेला #गुढीपाडवा ट्रेंड पुन्हा अव्वल दिशेने वाटचाल करू लागला आणि ठीक ०५:३०च्या दरम्यान #गुढीपाडवा अव्वलस्थानी दिसू लागला(#गुढीपाडवा अव्वलच कारण दुसराअव्वल ट्रेंड हा promoted होता) हे अव्वलस्थान सकाळी ०७:००am वा पर्यंत कायम होते, दुसरीकडे आपलाच मराठमोळा पण इंग्रजी लिपीतील 'happy gudi padwa' ट्रेंड सुरु होता देवनागरी आणि इंग्रजीत ट्रेंडिंग होण्याची ही आजवरची पहिलीच वेळ बरं का! अनेक लोकांनी चुकीचे hashtag वापरले तर काहींनी शब्दमर्यादेमुळे वापरलेच नाहीत तर काही लोक अनभिज्ञ होती त्यांना आम्ही ट्विट quote करून #गुढीपाडवा वापरण्याचे आवाहन केले
अनेक मराठी लोकांनी आपल्या गुढीचे फोटो,
 सेल्फी,गुढीचे माहात्म्य सांगणाऱ्या ट्विट्स करायला सुरुवात केली #गुढीपाडवा hashtag वापरून ट्विट करणारी काही मंडळी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, खा.सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री अमृता खानविलकर,सुरुची आडकर,प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार,प्रिन्सिपॉल मास्तर chef इंडियाचे संजीव कपूर
आ. सदा सरवणकर, खा. गजानन कीर्तिकर,नाशिकचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम मी मराठीचे नूतन संपादक तुळशीदास भोईटे इ. सह अनेक पत्रकार,अभिनेते,अभिनेत्री,इंजिनियर्स,डॉक्टर्स,कला,साहित्य,सामाजिक,क्रीडा,राजकीय क्षेत्रातील अनेकांनी #गुढीपाडवा hashtag वापरून हा ट्रेंड देशाच्या पटलावर घेऊन जाण्यात मोलाची कामगिरी बजावली!
           ८ एप्रिल २०१६ #गुढीपाडवा ट्रेंड keyhole, trendmap सह काही संकेतस्थळावरून
एकूण आकडेवारीची माहिती घेतली असता
मिळालेली अधिकृत आकडेवारी अशी;

(१) एकूण २४ तासात ३९४ स्वतंत्र लोकांनी मिळून retweet/post/reply चा एकत्रित विचार केला तर
५०२९+ ट्वीट्स केल्या आहेत.

(२) #गुढीपाडवा च्या impressions तब्बल
७८०७१४३ म्हणजे विविध अष्ठयात्तर लाख सात हजार एकशे त्रेचाळीस लोकांपर्यंत पोहोचला.

(३) #गुढीपाडवा चा reach ६४३०५९७ एवढा आहे अर्थात चौंसष्ट लाख तीस हजार पाचशे सत्यान्नव एवढ्या लोकांनी
 प्रत्यक्ष या hashtag च्या ट्विट्स पाहिल्या.

(४) #गुढीपाडवा वापरून देशविदेशात असणाऱ्या अनेक भारतीयांनी ट्वीट्स केल्यात यात
अमेरिकेतून ३.१% ट्विट्स, कॅनडा २%, दक्षिण आफ्रिका ०.१%, न्युजलँड ०.१%,ऑस्ट्रेलिया ०.७%,नेदरलँड ०.३%, इंग्लंड १.९% इत्यादी ट्विट्स झाल्या आहेत.

(५) आणखी एक प्रभावी बाब म्हणजे अँड्रॉइड धारकांकडून सर्वाधिक ७६.५%, iphone ०९.५%,कॉम्पुटर डेस्कटॉप ०५%,मोबाइल web ३%,windows फोन २.३%,ipad ०.६%,ट्विटर फॉर विंडोवस ०.३%,roundteam १.७%,ब्लॅकबेरी ०.९% users
अशा विविध उपकरणाच्या साहाय्याने तथा
वापरकर्त्याकडून #गुढीपाडवा वापरून ट्विटले गेले!

(६) प्रामुख्याने ५९.७% पुरुष व ४०.३% स्त्रियांनी
#गुढीपाडवा साठी सहभाग नोंदवला

(सौजन्य: keyhole डॉट कॉम आणि ट्रेंडमॅप डॉट कॉम )

ट्विटरवर @marathibrain , @marathirt, @marathiword, @marhati या social हँडलवरून नेहमीच वेगवेगळे उपक्रम होत असतात
या हँडल्स व्यतिरिक्त झटणारी अनेक
मंडळी आहेत जी आपापल्या परीने महाराष्ट्रासाठी/मराठीसाठी आपले योगदान देत असतात त्यांचेही आभार! याव्यतिरिक्त @rava_official @marathivichar सारखी हॅन्डल्सही आहेत
हि मंडळीही twitter च्या सगळ्या
मराठी उपक्रमात स्वतःला झोकून देत असतात आजकाल प्रिंट व डिजिटल media वालेही लोकभावनेचा आदर करायला लागलीत
हि जमेची बाजू म्हणावी लागेल!
यापुढे अशीच एकी ठेऊन आपण एकदिलाने मराठीची पताका सातासमुद्रापलीकडे पोहोचवूया,कारण '
मराठी ट्विटर ट्रेंड हे मराठी संस्कृतीला अटकेपार नेण्यासाठीचे सर्वात प्रभावी माध्यम आहे' हे आपण जाणतोच! नाही का? चला तर मग कामाला लागूया कुणीतरी म्हटलेलंच आहे

'मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा'

धन्यवाद.

@madanegopal
  मो.९९६०२७९३१०

२ टिप्पण्या:

  1. गोपाल भाऊ खूप छान लिहिलंय. संपूर्ण उपक्रमाचा सविस्तर आढावा मांडून जणू उपक्रमाचा इतिहास कायमचा शब्दांमध्ये संचयित झाला आहे. यातून सतत पूढच्या उपक्रमांसाठी प्रेरणा मिळेल.
    उपक्रमाबद्दल बोलायचे झाले तर यात मिळालेले यश काही थोडे नव्हे. संपूर्ण मराठी लोकांचा व ट्विटरकरांचा हा विजय आहे. गैरमराठी जणांचाही खूप हातभार लागला.
    ब्लॉगबद्दल खास म्हणजे इतकी माहिती आणि आकडेवारी आपल्या प्रत्येकाला सहज लाभत नाही पण ती या ब्लॉगमधून मिळते.
    खूपच छान... पुढच्या उपक्रमासाठी शुभेच्छा!!����

    उत्तर द्याहटवा

स्वत:चे ब्लॉगस्पॉट संकेतस्थळ कसे सुरू कराल?

मला आठवतंय शाळेत असताना “माझी रोजनिशी” नावाचा एक धडा होता,त्यात रोज घडणार्‍या बाबी त्यात लिहून काढणे हा त्या मागचा उद्देश ज्यातून आपल्या चु...