रविवार, १५ फेब्रुवारी, २०१५

" भारताची 'विराट' कामगिरी : भारत जोमात;पाक कोमात ! "


     आज झालेला भारत-पाकिस्तान हा सामना सर्वांना खुप आनंद देऊन गेला…कारण हा रविवार वाया गेला असे कोणी बोलणार नाही…काय match झाली राव आज !! टीम इंडिया
2 महीने Australia त होती पण या कालावधीत विजयाने टीमला कधी स्पर्शच झाला नाही! दोन्ही मलिका आपण हारलो(one-day series व test series) कदाचित यानेच की काय भारतीय चाहत्यात यंदा
फारसा उत्साह कुठे दिसत नव्हता अगदी विश्वचषक स्पर्धा सुरु झाली तरी सर्वजण फक्त भारत-पाकिस्तान match चीच वाट पाहत
होते काल(matchच्या पूर्वसंध्येला)
 पाक मीडियावाले खुप तावातावाने जुना रिकॉर्ड काढून सांगत होते
की पाकिस्तानच जिंकणार…आम्ही(पाकने) भारताविरुद्ध 60-65% सामने जिंकलेत !हो हे खरं आहे…पण तो काळ 1970-1990 पर्यंतचा होता
त्यावेळी आपली टीम फारशी बळकट नव्हती…पण1990 नंतरचा रिकॉर्ड बघितला तर 75% सामने भारताने जिंकलेत हे समोर येईल…worldcup चा record जर पाहिला तर मग100% सामने अर्थात सर्व 6 सामने आपणच जिंकले आहेत…
पण पाकिस्तान मीडिया वाले यागोष्टीवर न बोलता जुने रिकॉर्ड काढून
दाखवत होते किंवा भारताचा मागच्या Australia दौ-यात case to case भारतीय players ची कामगिरी दाखवत होते…असो तो
     मी काल 2 पाक news चैनल्सचे शो
पाहिले होते  सर्वत्र अगदी एकतर्फी विश्लेषण सुरु होते यात युसूफ योहाना सकलेन मुश्ताक व बरेच पाकिस्तानी एक्सपर्ट होते अगदी संवेदना हरवल्यासारखे त्यांचे विश्लेषण होते…
त्यात भारताला खुप खुप कमी लेखण्यात आले होते…
पण आता पाहिले त्याच पाक
मीडिया व पाक एक्सपर्टची
 खुप गोची झालीय…
त्यांचे frustration ते आता त्यांच्याच
खेळाडूंवर ताव काढत आहेत ! एवढे झेल सुटले तेवढे झेल सुटले याने batting खराब केली अमुक-तमुक खुप आरोप चालू झालेत…अजुन एक ताजी माहिती अशी की,
हा पराभव जिव्हारी लागलेल्या
काही पाक चाहत्यांनी teampakistan
हरली म्हणून रस्त्यावर बाहेर येऊन TV फोडले
अफ्रिदीच्या घरासमोर येवून विरोधात घोषणा
दिल्या…इतर match च्या बाबतीत

हे घडत नाही
पण भारत-पाक पारंपरिक प्रतिस्पर्धी
 खुप खुन्नस
'विश्वचषक जिंकला नाही तरी चालेल
 पण एकमेकाविरुद्धचा सामना आपण जिंकलाच
पाहिजे" अशी दोन्ही देशाच्या लोकांची
अपेक्षा असते…मग यापैकी जो हरेल त्यांचे
समर्थक आपला राग खुप वाईट पद्धतीने
व्यक्त करतात जो पाकिस्तानी चाहत्यांनी
केला…असो…भारताच्या बाबतीतही हेच झाले असते नाही का ??



   आजच्या सामन्यावर येवुयात……
पुन्हा एकदा आम्हीच राजा हे भारताने
पाकला
सुनावले…एक गोष्ट आवडली ती म्हणजे
हा संवेदनशील सामना खिलाडूवृत्तीने झाला ही जमेची बाजू।
विराट कोहलीने पुन्हा
आपले नाणे
खणखणीत वाजवून दाखवले!
विराटचे अर्धशतक किंवा शतक
म्हणजे भारताचा विजय हे समीकरणच बनलेले आहे कारण भारत विराटमूळे 85-90% सामने जिंकला आहे यावरून कोहलीचे योगदान अधोरेखित होते…आज केलेले शतक सुद्धा याचेच उदाहरण…
अर्थात नवा सचिन म्हणजेच विराट कोहली असे मी तर मानतो बाबा! सचिनचे खुप सारे विक्रम तोच मोडू शकतो असे अनेक क्रिकेटसमीक्षक जाहिर बोलतात…
शिखर धवनलासुद्धा पुन्हा सुर गवसला…ही
जमेची बाजू! आज त्याने 73 धावांचा
 खेळ केला…
रैनाने तर धडाकेबाज फिफ्टी करून धमाल उडवून दिली…मी तर पूर्वीपासुनच रैनाचा चाहता…त्याचा पुलशॉट
खरच लाजवाज असतो…आज सुद्धा तो खास शैलीत दिसला. रैना असेल तर "रैना है ना"
असे लोक का म्हणतात!
   आपला कर्णधार माही अर्थात धोनीची
कैप्टनशीप किती अव्वल आहे हे आज
पुन्हा एकदा दिसलेच! कोणाला कधी bowling द्यायची

 हे त्याला लगेच समजते!
रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आज जरी
लवकर बाद झाले असले तरी दोन्ही मुंबईकरात
खुप talent आहे…यापुढील सामन्यांत दिसेलच
हे…जडेजा अश्विन हे अष्टपैलू सुद्धा ब-यापैकी
फॉर्ममध्ये आहेत…मोहित शर्मा,उमेश यादव,मोहम्मद शमी आज खुपच प्रभावी ठरले(अपवाद काही षटकांचा).अपेक्षा
करतो यापुढेही स्पर्धेत आपल्या सर्व गोलंदाजांचा
सुर चांगला राहिल…आज संधी न मिळालेला
अंबाती रायडू, अक्षर पटेल,भुवनेश्वर कुमार
सुद्धा खास खेळाडू आहेत…संधी मिळाली
तर ते सुद्धा त्याचे सोने करतील यात शंका नाही…!

    एकंदर आज सर्वत्र एक देश
 एक रंग एक आवाज
इंडिया इंडिया इंडिया……भारत माता की जय असे एक ना अनेक आवाज संपूर्ण भारतात
 घुमत होते मी सुद्धा माझ्या काही मित्रांसोबत
या सामन्याचा आनंद लुटला…खरच एका
match ने भारतीय क्रिकेट चाहत्यात एक नवा
रंग भरला आहे…आता नक्की यापुढे लोकांत
उत्साह भरेल…अशी आशा करुया! आता
येत्या रविवारी २२ फेब्रुवारीला
भारत-द.अफ्रीका हा थरार आपल्या सर्वांना
अनुभवता येईल…हा सामना सुद्धा रोमांचक होईल यात शंका नाही! भारतीय संघ विश्वचषक आणेल का याबाबत उत्कंठा आहे याला खुप अवकाश आहे कालांतराने सर्व
 गोष्टी स्पष्ट होतीलच…पण माझा ठाम विश्वास आहे
भारत उपांत्य फेरी सहज गाठेल…आणि कदाचित
अंतिम फेरी सुद्धा! पण अशीच दर्जेदार सांघिक कामगिरी
व्हायला हवी
       माझ्या भारतीय संघाला खुप खुप शुभेच्छा।
"कहो दिलसे……भारत फिरसे" jay hind jay bharat!

धन्यवाद ! :)

(हा ब्लॉग msoffice व wordpad वापरून type केला आहे व मोबाइल द्वारे post केला आहे त्यामुळे समास/paragraph हवे तसे पोस्ट होत नाहीत समजुन घ्या धन्यवाद :) )




1 टिप्पणी:

  1. Lucky Club Casino Site - Live Casino
    Lucky Club Casino is an online casino that allows you to luckyclub.live play with your favorite players. The site has a lot of games such as blackjack, roulette, blackjack

    उत्तर द्याहटवा

स्वत:चे ब्लॉगस्पॉट संकेतस्थळ कसे सुरू कराल?

मला आठवतंय शाळेत असताना “माझी रोजनिशी” नावाचा एक धडा होता,त्यात रोज घडणार्‍या बाबी त्यात लिहून काढणे हा त्या मागचा उद्देश ज्यातून आपल्या चु...