सोमवार, २३ फेब्रुवारी, २०१५

"हा ट्विटर ट्रेंड बनतो तरी कसा बरं…? संपूर्ण पोलखोल"


      सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा विशेषतः शिक्षित पिढीचा अविभाज्य घटक आहे, यामध्ये प्रामुख्याने Facebook,  instagram, Telegram, hike, यु ट्यूब, ऑनलाइन व्यवहार इ.यासह ब-याच गोष्टीमुळे जग जवळ आले आहे.सोशल मीडियात सर्वात जास्त फेसबुक वापरणारे व त्याखालोखाल ट्विटर वापरणारे(users) आहेत,दोन्ही गोष्टीचा विचार (facebook&twitter) करता दोन्हीकडे सर्वात जास्त लोकप्रिय बाब म्हणजे ट्रेंड्स अर्थात trends !आणि हेच ट्रेंड्स बनतात तरी कसे याबाबत आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात…twitter वर सर्वाधिक वापरकर्ते भारतीय आहेत.भारत ही जगातील सर्वात मोठी उपलब्धी आहे हे जाणून चाणाक्ष twitter ने नुकतेच दहा भारतीय भाषामधून ट्रेंड्स सुरु केले आहेत यात प्रामुख्याने हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू इ प्रमुख भाषा समाविष्ट आहेत…
आता पाहुया की twitter वरील या लोकप्रिय ट्रेंड्स(trends) बद्दल सर्वांच्या मनात असणारे काही प्रश्न………
(1)ट्रेंड (trend) म्हणजे काय? तो कसा बनतो?
(2)या ट्रेंड्सला एवढे महत्त्व का?
(3)trend ला हैश(#) का वापरतात?
(4)या ट्रेंड्सचे प्रकार किती व कोणते?
(5)एक local trend बनायला किती वेळ लागतो?
(6)एक worldwide trend बनायला किती वेळ लागतो?
(7)किमान किती tweets केल्यानंतर twitter ट्रेंड बनून टॉप 10 मध्ये येतो.
(8)ट्रेंड कोठून बनतो अर्थात याला काही server location आहे का?
(9)ट्रेंड बनवायचा असेल तर किती लोकांचा सहभाग असावा?
(10)trends बनताना retweet गृहीत धरले जाते का?
(11)Trends मधील tweets कशा मोजल्या जातात?यासाठी कोणते संकेतस्थळ आहे का?
(12)promoted trend म्हणजे काय?याचा उपयोग काय?
(13)सेलेब्रिटींचे ट्रेंड्स लगेच बनतात मग सर्वसाधारण users नी प्रयत्न करूनही trend का बनत नाही?
(14)दिवसात जास्तीत जास्त किती ट्रेंड्स बनू शकतात?बनलेला trend कितिवेळ टिकतो?

यासह बरेचसे प्रश्न सर्वांपुढे (twitter प्रेमीपुढे) पडले असतील,या सर्व प्रश्नाची एकत्र माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात…
 "ट्विटर ट्रेंड हा hashtag(#) जोडून एखाद्या लोकप्रिय शब्दाचा आधार घेवुन ठराविक वेळेला ठरवून केला जातो तर काही ट्रेंड्स त्यादिवशी घडलेल्या घटनेविषयी यूजर्सकडून त्याबद्दल चर्चा होवून बनतो. उदा.#IndvsPak #MakeinIndia #मराठीदिन इ. यामध्ये हैश(#) कीवर्ड किंवा phrase आहे या # ला विशेष महत्त्व आहे कारण # लिंक म्हणून काम करतो…थोडासा फरक बघा बिगर हैश 'मराठी' व '#मराठी' यात #मराठी clickble अर्थात लिंकसारखा असल्याने आपण त्या hashtag शब्दाच्या सर्व ट्वीट्स पाहू शकतो पण जर#नसेल तर तो शब्द clickble नसतो,आता तुम्ही म्हणाल #नसलेले शब्द सुद्धा ट्रेंड कसे बनतात? अहो बनणारच! twitter चा असा कोणताही नियम नाही की तुम्ही ट्रेंड बनवताना #(हैश) जोडले पाहिजे! हैश हा clickble असल्याने सर्वांच्या सोईसाठी त्या शब्दाशी संबधित tweets पाहता याव्यात यासाठीच # जोडतात।
ट्विटर ट्रेंड्स मध्ये promoted ट्रेंड्स हासुद्धा पर्याय असतो अर्थात यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात.मोठे उद्योग जगतातील लोक व्यवसायाची व स्वतः च्या संस्थेची वृद्धि करण्यासाठी याचा #promoted trend च्या माध्यमातून प्रचार प्रसार करतात…2-3 tweets सुद्धा पुरेशा असतात प्रमोटेड ट्रेंड बनण्यासाठी…अजब बाब आहे ना?! असो अर्थात इथे पैसा बोलतो!
यात(promoted) राजकारणी,सेलिब्रिटी,उद्योगजगत यातील लोक प्रामुख्याने असतात. असो……

आपल्याला जगातील सर्व देशाचे ट्रेंड्स काय आहेत हे पाहता येते.त्यासाठी तुम्हाला Discover मध्ये जावून trends हा पर्याय उघडून सेटिंगमधून आपण ठिकाण (location) बदलून त्या त्या देशाचे टॉप 12-13 लोकल ट्रेंड्स काय आहेत हे पाहू शकता.असे शेकडो ट्रेंड्स  दर 4-5 तासाला वापरकर्त्याच्या(users) च्या प्रतिसादानुसार बदलत असतात…किंवा लोकल ट्रेंड्स अगदी शहरानुसार
पहायचे असल्यास तुम्ही www.tweetindiamap.com या संकेत स्थळावर भेट देवून सखोल माहिती घेऊ शकता…

 आता पाहुयात twitter ट्रेंड बनण्यासाठी कोणता फ़ॉर्मूला By default ट्विटरकडून वापरला जातो…अर्थात ट्विटर ट्रेंड कसा बनतो.
ट्विटरचे analysis, design, coding, implementation या बाबी अतिशय सखोल करण्यात आल्या आहेत… "एकाच ठराविक वेळी एकाच विषयावर(ट्रेंड) tweeting करणारे लोक(users) व tweets ची संख्या यावर ट्रेंड बनतो"
अमेरिकेतील twitter वरील बाबींचे संशोधन करणा-या hello@jungle_media.com व forums. digitaspy.co.uk यांच्या सर्वेनुसार (आकडेवारी dec 2012)
दिवसाला 1.9 millian (19 लाख) लोकांकडून सरासरी 631737 एवढ्या tweets होतात तर प्रतितास 48433 एवढ्या tweets चा पाऊस पडतो।
आता पाहुया local+worldwide ट्रेंड कसा बनती?
(1)मध्यरात्री 12:00am-6:00am = अंदाजे 1200 tweets व वेगवेगळे 500 यूजर्स.
(2)सकाळी 6:00am-12:00pm =अंदाजे 1700 tweets व वेगवेगळे 733 यूज़र्स
(3)दुपारी 12:00pm-6:00pm = अंदाजे 1500 tweets व वेगवेगळे 812 यूजर्स
(4)सायं 6:00pm-12:00am = अंदाजे 1900 tweets व वेगवेगळे 922 यूजर्स

अर्थात ही आकडेवारी 2012 ची आहे…
2013, 2014 या दोन वर्षात झपाट्याने वाढलेले दुप्पट तिप्पट twitter वापरकर्ते पाहता
वरील आकडेवारीत 70-80% tweets व वापरकर्ते वाढवावे लागतील…
forum.digitspy.co.uk व hellow@jungle_media.com व ट्विटर experts च्या संशोधनाचा मेळ घातला तर सध्याची 2015 च्या ताज्या आकडेवारीनुसार
ट्रेंड खालीलप्रमाणे बनेल…

(1)मध्यरात्री 12:00am-6:00am = अंदाजे 3800 tweets व वेगवेगळे 1525यूजर्स.
(2)सकाळी 6:00am-12:00pm =अंदाजे 4700 tweets व वेगवेगळे 2100 यूज़र्स
(3)दुपारी 12:00pm-6:00pm = अंदाजे 4350 tweets व वेगवेगळे 2275 यूजर्स
(4)सायं 6:00pm-12:00am = अंदाजे 5050 tweets व वेगवेगळे 2375 यूजर्स

अर्थात हा सर्वे अमेरिकन (वेळ)घड्याळानुसार आहे! एकंदर एखादा ट्रेंड बनण्यासाठी 'ते' एकुण tweets ,सामिल झालेले एकूण यूज़र्स आणि वेळ या तिन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात…एक महत्वाची बाब म्हणजे ट्रेंड्स बनताना Retweet सुद्धा समाविष्ट/गृहीत धरले जातात.म्हणजेच जेवढ्या वेळा तो शब्द retweet केला गेला तेवढ्या वेळा तो गृहीत धरला जातो! उदा. #मराठी एखाद्या tweet मध्ये10वेळा आला असेल व दुस-याने तो tweet हा Retweet केला तर आणखी 10 काउंट होते…ट्रेंडसाठीची वरील आकडेवारी पाहता number of tweets चा criteria लगेच पूर्ण होतो पण अपेक्षित लोकांचा सहभाग जास्त असणे अत्यावश्यक आहे…एवढेच!

आणखी एक बाब खरंतर वरच नमूद करायला हवी होती ती म्हणजे किमान 1-2 verified account वरून trend चे tweets झाल्यास ट्रेंड twitter trend लवकर बनतो 

ट्रेंड्स ची मागील 7 दिवसांची history, जगातील कोणत्याही भागातील जुने किंवा ताजे लोकल ट्रेंड्स सखोल पाहण्यासाठी www.trendsmap.com या संकेत स्थळाला अवश्य भेट द्या…
खुप खुप धन्यवाद :-)


(वरील आकडेवारी (trends:time,total tweets&participate user)  ही संकेतस्थळानुसार असून एकूण सरासरी आहे…एखाद्या दिवशी काही महत्वाच्या ब-या वाईट घटना घडल्यास यूजर्स कमीजास्त होऊ शकतात! याने वरील गुणोत्तर किंचित कमी जास्त होऊ शकते!)

(Twitter ID → @madanegopal)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वत:चे ब्लॉगस्पॉट संकेतस्थळ कसे सुरू कराल?

मला आठवतंय शाळेत असताना “माझी रोजनिशी” नावाचा एक धडा होता,त्यात रोज घडणार्‍या बाबी त्यात लिहून काढणे हा त्या मागचा उद्देश ज्यातून आपल्या चु...