मंगळवार, २१ जुलै, २०१५

" डिजिटल इंडिया संकल्पनेतील डिजिटल लॉकर नक्की काय आहे बरं..? "

भारत सरकारने डिजिटल इंडिया ही संकल्पना सुरु करून भारताला काही प्रगत देशांच्या रांगेत नेऊन ठेवले.
सतत चर्चेत असणारा हा डिजिटल इंडिया काय प्रकार आहे बरं? यापेक्षाही मला  वैयक्तिक आवडलेला प्रकार म्हणजे 'डिजिटल लॉकर' आणि याचविषयी आपण
थोडक्यात माहिती घेऊ,त्यापूर्वी सर्वांच्या मनात असणारे काही काही प्रश्न....
(1) डिजिटल इंडिया म्हणजे काय?

(2) आपली लाइफ डिजिटल होणार म्हणजे नक्की काय होणार?

(3) डिजिटल इंडिया ही संकल्पना का आणली गेली?

(4) हा 'डिजीटल लॉकर' काय प्रकार आहे?

(5) या डिजिटल लॉकर लॉकर साठीचे सुरक्षित संकेतस्थळ आहे का?

(6) डिजिटल लॉकर संकेतस्थळला मोबाइलचा वापर करून दस्तऐवज स्टोअर करू शकतो का?

(7) साधारण किती कागदपत्रे आपण स्टोअर करू शकतो? याला स्टोरेज मर्यादा आहे का?

(8) आधार क्रमांक नसेल तर तुम्ही डिजिटल लॉकरचे अकाउंट काढू शकता का?

(9) जर आधार कार्ड असेल पण मोबाइल नंबर आधारला लिंक नसेल तर password create होताना येणाऱ्या समस्येला दूसरा मार्ग आहे का?

(10) डिजिटल लॉकर फक्त विद्यार्थ्यांसाठीच आहे का?

(11) डिजिटल लॉकर स्टोअर केलेल्या कागदपत्रांची सत्यता कशी तपासणार?

(12) या डिजिटल लॉकरला पूर्वीच्या किचकट इ-साइनिंग यूएसबी डॉगल पद्धतीने आहे की आणखी काही?

(13) ही डिजिटल लॉकर पद्धत कितपत यशस्वी ठरणार?

     असे असंख्य प्रश्न तुमच्या आमच्या मनात पडले असतील...या सर्व बाबींची  उत्तरे एकत्रीत पाहण्याचा प्रयत्न करू...


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'डिजिटल इंडिया सप्ताह' नुकताच पार पडला,खऱ्या अर्थाने भारताने एक पाऊल पुढे टाकले असे आपण म्हणू शकतो याला  कारण असे की देशातील लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांचेच जीवन डिजिटल व्हायला सुरुवात होणार आहे! या डिजिटल इंडियाने सर्वांचेच जीवन अद्ययावत होणार, मतदान प्रक्रिया ऑनलाइन होणार यावर एक समिती लवकरच हिरवा कंदील दाखवेल, शेतकऱ्यांना त्याच्या मालाचा भाव ऑनलाइन बाजारपेठेमुळे स्वतः ठरवता येणार,म्हणजेच संबधीत संकेतस्थळांवर शेतकरी जगातील बाजारपेठांच्या भावाची तुलना करूनस्वतः किंमत ठरवून हव्या त्या ठिकाणी आपला शेतमाल विकू शकणार! म्हणजेच दलालांच्या जाचातुन बळीराजाची मुक्तता! मतदान कार्डशी आधार क्रमांक जोडला जाणार याने दुबार/बोगस मतदार सापडणार म्हणजेच पर्यायाने मतदान प्रक्रियेत पारदर्शकता येणार! सर्व ग्रामपंचायती/नगरपालिका ऑनलाइन होणार याने प्रशासन व गावाचा थेट  समन्वय साधून विकासाला चलना मिळणार! ऑनलाइन एप्लीकेशन देताच RTO कडून लायसन्ससाठी परीक्षा देता येणार,इथेही दलालांपासून मुक्ती! संपूर्ण देशात लवकरच व्यापाऱ्याना एकच ऑनलाइन करप्रणाली येणार! एवढंच काय संपूर्ण भारतासाठी एकच टोलटॅक्स,वर्षातून एकदाच ठराविक रक्कम भरा आणि संपूर्ण भारतभर प्रवास करा,यासाठी स्मार्ट कार्डची कल्पना प्रस्तावित आहे,भारतातील सर्व धार्मिक स्थळे,पर्यटन स्थळे ऑनलाइन जोडली जाणार!
थोडक्यात काय सर्वाच्या सर्व बाबी ऑनलाइन
 जोडल्या जाऊन भारताला जगात प्रगत राष्ट्रांत नेऊन ठेवण्यासाठी एक कौतुकास्पद प्रयत्न होयोय....असो

       डिजिटल इंडिया या प्रकारातील मला वैयक्तिक आवडलेला सर्वात छान बाब म्हणजे 'डिजिटल लॉकर'
हा प्रकार मला एवढ्यासाठी खास वाटतो की
 याने शिक्षितांना नोकरीच्या मुलाखतीसाठी फाइल वागवत बसावे लागणार नाही कारण सर्व कागदपत्रे डिजिटल लॉकर संकेतस्थळावर  स्टोअर असेल...मस्त आईडिया आहे ना! या डिजिटल लॉकरला 'डिजिलॉकर'  असेही म्हणतात बरं का! कुलुप? हो...आणि हे कुलुप/लॉकर याची किल्ली तुमच्याकडे हवीच!!



नक्की काय आहे डिजिलॉकर? बघुयात? 
डिजिलॉकर ही एक वेबसाइट आहे जिथे महत्वाचे दस्तऐवज, कागदपत्रं ठेवायची मोफत सोय भारत सरकारने केली आहे.
ही सुविधा फक्त विद्यार्थांसाठीच  आहे का? तर नाही... प्रत्येक शिक्षित व्यक्ती digilocker सुविधेचा फायदा घेऊ शकतो... शिक्षण किंवा नोकरी यासाठी आपल्याला महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावीच लागतात,कुठे अर्ज भरताना पळापळ करून अनेक कागदपत्रं जमवावी लागतात वोटर आयडी,पासपोर्ट,विविध दाखले,पैनकार्ड याची झेरॉक्स कॉपी करा  नंतर ती ट्रू कॉपी करा या सर्व  कटकटीवर रामबाण उपाय म्हणजे  डिजिटल लॉकरवर अकाउंट काढणे! काय कराल? 
        
 (a) तुम्हाला  डिजिलॉकर वापरण्यासाठी https://digitallocker.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

(b) तुम्हाला आधार क्रमांक  हा अनिवार्य 
आहे शिवाय आधारला जोडलेला मोबाइल नंबरही असावाच!

(c) तुम्ही वरील संकेतस्थळावर आधार कार्ड व मोबाइलवर आलेला OTP (one time password) वापरून लॉगीन करू शकता.
किंवा तुमचा जर मोबाइल नं आधारशी लिंक नसेल
तर मात्र  तुम्हाला थम्ब पध्दत वापरावी लागेल त्यावरून यूजर नेम व पासवर्ड सेट होईल.

(d) एंड्रॉइड फोन धारकांसाठी 'Digilocker App'  google प्लेस्टोरमध्ये उपलब्ध आहे त्यावरूनही digilocker अकाउंट शक्य आहे तत्पूर्वी तुम्हाला तुमची सर्व महत्वाची कागदपत्रे अगोदर स्कैन
करून घेणे आवश्यक आहे.

(e) तुम्ही स्कैन केलेली महत्वाची कागदपत्रे, वोटर कार्ड,पैन कार्ड,मार्क शीट्स, जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,डोमासाइल सर्टिफिकेट,इनकमटॅक्स रिटर्न्स इ. सह अनेक सर्व प्रकारची महत्वाची कागदपत्रे  डिजिलॉकरवरती  स्टोअर करू शकता.

(f) डिजिटल लॉकरचा स्टोरेज क्षमता 10 MB आहे, एवढ्या जागेत बरीच कागदपत्रे स्टोअर होऊ शकतात
भविष्यात 1 GB पर्यंत ही क्षमता वाढणार आहे!

(g) या लॉकरमध्ये कागदपत्रे ठेवली की त्या प्रत्येक महत्वाच्या दस्तऐवजांसाठी तुम्हाला एक लिंक मिळेल, सध्या अनेकजण  बरेच फॉर्म्स ऑनलाइन भरतो.हळूहळू या फॉर्म्समध्ये तुमच्या दस्तऐवजासाठी स्कैनप्रतीऐवजी फक्त ही लिंक पोस्ट केली की त्या त्या संस्थेला किंवा शासकीय कार्यालयाला तुमच्या दस्त ऐवजाचा एक्सेस मिळेल.

(h) महत्वाचे म्हणजे डिजिटल लॉकरवर  वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांनी जारी केलेल्या दस्तऐवजांची एक यादी असेल ज्याने  आपल्या कामासाठी नक्की काय कागदपत्रे लागतील हे कळेल, अर्थात  आपली अडवणुक टळेल.

(i) इतकेच काय तुम्ही नोकरीचे  विविध फॉर्म्स भरताना
कोणकोणत्या शासकीय कार्यालयांना तुम्ही तुमच्या दस्तऐवजांचा एक्सेस दिला आहे याची यादी तुम्हाला इथे पाहता येईल.

(j) डिजिटल लॉकरमधील आणखी एक महत्वाची बाब  म्हणजे ई-साइनिंग (e-signing) डिजिटल सिग्नेचर!
ऑनलाइन फॉर्मस भरताना बऱ्याचदा आपली डिजिटल सिग्नेचर बऱ्याच फॉर्म्स् वर आवश्यकता असते, कारण पूर्वीची E-Signing पद्धत किती  किचकट आहे आपण जाणतोच.आपल्याला इ-सिग्नेचर करताना आपल्याला इश्यू केलेला एक यूएसबी डॉगल जोडल्याशिवाय sign करताच येत नाही म्हणजे डॉगल वागवत न्यायची कटकट आलीच...:-(  पण डिजिटल लॉकरने हा  प्रॉब्लम सोडवला आहे अर्थात डिजिलॉकरमध्ये डॉगल वापरायची गरज उरणारच नाही... आहे ना चांगली बातमी



>> "Digital Locker च्या काही मर्यादा"

(a) ही योजना जरी वेळ वाचवणारी असली तरी ग्रामीण भागात इंटेरनेट सुविधा योग्य पद्धतीने नसल्याने
शहरात येऊन साइबर कॅफेचा वापर करावा लागतोय.
बाब खर्चिक आहे.

(b) digilocker पूर्णता यूजर फ्रेंडली आहे,मोबाइल वरूनही  तुम्ही तुमचे अकाउंट काढू शकता पण आपली scanned डॉक्युमेंट्स स्टोअर करायची असल्याने जिथे scanner मशीन जिथे असेल तिथुनच scan करून त्याची सॉफ्टकॉपी जवळ असणे अनिवार्य आहे.

(c) आधारशी बऱ्याच लोकांचे मोबाइल नंबर न जोडले गेल्याने OTP जाण्यास पर्यायाने अकाउंट तयार व्हायला अडथळे येताहेत.

>> "डिजिटल लॉकर पद्धत खरच सुरक्षित आहे"

(1) digilocker ही भारत  सरकारची सुविधा असल्याने व तज्ञ अभियंत्याच्या टीमने हे संकेतस्थळ बनवले असल्याने
गूगल ड्राइव, माइक्रोसॉफ्ट वन ड्राइव किंवा ड्रॉप बॉक्स यासारख्या खासगी आणि परदेशी सेवांपेक्षा नक्कीच अधिक 
सुरक्षित आहे.

(2) आधार लिंक जोडली गेल्याने ज्याप्रकारे मोबाइल बँकिंग सुविधा सुरक्षित  आहे त्याचप्रकारे ही सुविधा अ
धिक सुरक्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

शेवटी थोडक्यात काय माहिती तंत्रज्ञानात जगातील
काही राष्ट्रांनी खुप मोठी प्रगती केली मग सुरु  झालेल्या डिजिटल इंडिया  पर्वात सर्वांनी सहभागी व्हावेच लागणार आहे त्यासाठी डिजिटल होत चाललेल्या या देशात ही नवीन घडामोड़ आपल्याला महितीच पाहिजे म्हणून प्रत्येक शिक्षित व्यक्तीने डिजिलॉकरचे खाते
काढणे गरजेचे आहे कारण ही काळाची गरज आहे किमान त्यामुळे तरी आपली कागदपत्रं एका जागी राहू शकतील... नाही का?
    मला मिळालेल्या माहितीनुसार डिजिटल लॉकरला सर्वात जास्त   प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळतोय  पहिल्याच आठवड्यात 1 लाख+ लोकांनी डिजिलॉकर अकाउंट उघडले आहे,म्हणजेच आपले मराठीजन नक्कीच याबाबत सकारात्मक आहेत ही आनंदाची व सकारात्मक बाब आहे. 

   सदर लेख तमाम मराठी जनतेला बहुचर्चित व महत्वाचा
डिजिटल लॉकर हा मुद्दा व्यवस्थित समजावा यासाठी ही थोडीशी खटपट... धन्यवाद :)

प्रतिक्रिया कळवा

Twitter @madanegopal

www.gopalmadane.blogspot.in

madanegopal@gmail.com

मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

असा ट्रेंडला जातो ट्विटर ट्रेंड....काही टिप्स


नमस्कार , मागील दोन लेखात मी ट्विटर ट्रेंड्स बनतो तरी कसा याबाबतीत पोलखोल केली होती तर दुसऱ्या लेखात ट्विटर ट्रेंड हा मराठी संस्कृतीला कसा अटकेपार नेऊ शकतो हे पाहिले!

  दररोज जगाच्या कानाकोप्-यातून हजारो ट्रेंड्स बनत असतात आणि 210+ देश असणाऱ्या या  जगातून
असंख्य ठिकाणी लोकल/ग्लोबल ठिकाणी ट्रेंड्स बनत असतात.
कैलिफोर्नियात सर्वर लोकेशन असणाऱ्या या ट्विटरने भारतातील तब्बल सर्वात मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या
10+ भारतीय भाषा ट्रेंडसाठी खुल्या केल्या आहेत! याला  ट्विटरबद्दल वाढणारे भारतीयांचे वाढते आकर्षण व ट्विटरसाठी भारत ही सर्वात मोठी  बाजारपेठ असणे या बाबी कारणीभूत आहे

आता या लेखात ट्विटर ट्रेंड कोणकोणत्या बाबी महत्वपूर्ण ठरतात हे पाहुयात.....

आजकाल आपण पाहतो काही ट्रेंड्स ठरवून केले जातात तर काही ट्रेंड्स आपोआप बनतात तर काही
 ट्रेंड्स पैसे देऊन (promoted) बनवले जातात ,असो!

forums.digitaspy.co.uk , trendmap.com , topsy.com , hello@jungle.media.com  या ट्विटरवर survey करत असणाऱ्या संकेत स्थळांच्या तपशीलानुसार/सर्वेनुसार
ट्विटर ट्रेंड बनवताना काही अत्यावश्यक टिप्स
खालीलप्रमाणे...

(1) ट्विटर ट्रेंड करताना नक्की कोणता शब्द ट्रेंड करायचा हे निश्चित करा.

(2) तुमचा ट्रेंड बनवण्याचा 2-3 तासांचा वेळ निश्चित करा
याने भरपूर यूज़र्स एकत्र सहभाग नोंदवतना  वेगात भरपूर ट्वीट्स ट्विटर सर्वर लोकेशनवर सेव होतात याने
 ट्रेंड वेगात उसळी घेतो व काही मिनिटांत तो लिस्टमध्ये दिसू लागतो.
लक्षात घ्या तुम्ही दिवसभर ट्वीटिंग करत बसण्यापेक्षा
ठराविक वेळेत tweets पोस्ट करा निश्चित फरक पडतो

(3)  तुमच्या ट्वीट्स किती झाल्या यापेक्षा जास्तीत जास्त किती लोकांकडून तो हैशटैग mentain झाल्या यावर  twitter trend चे गुणोत्तर अवलंबून असते.

(4) verified अकाउंटवरुन त्या हैशटैगचा ट्वीट आल्यास जास्तीत जास्त लोकांनी त्याला retweet करणे  व तो  ट्वीट टॉप लिस्टमध्ये पोहोचवणे  अत्यंत आवश्यक आहे.

(5) याशिवाय 1k+ ,2k+, 3k+, 4k+, 5k+, 6k+......10k, 15k+ ........followers आहेत यांचा सहभाग सर्वात महत्वाची भूमिका बजावतो कारण अशांच्या ट्वीट्स मधूनच् टॉप ट्वीट्स बनतात ज्या खुप महत्वाच्या  भूमिका बजावतात!

(6) top tweet म्हणजे ज्या हैशटैग असलेल्या ट्वीटला  जास्तीत जास्त retweet मिळतात अशा ट्वीट्स.

(7) जर किमान 5 ते 10 वेगवेगळ्या वापरकर्त्याच्या tweets ना 30+, 40+ .....retweets आल्यास त्या ट्रेंड्सचा trend rate झपाट्याने वाढतो.

(8) आणखी एक बाब म्हणजे जो हैशटैग आपण ट्रेंड बनवत आहोत तशा नमूद असणाऱ्या ट्वीट्स retweet मारणे. उदा. #महाराष्ट्रदिन हा ट्रेंड बनवताना ज्या ज्या ट्वीट्समध्ये #महाराष्ट्रदिन हा शब्द नमूद आहे तो tweet हा सर्वांनीच retweet मारणे आवश्यक आहे.

(9) अर्थात त्या ट्रेंडच्या mentain ला (उदा. #महाराष्ट्रदिन) दुसऱ्याने RT दिला तर तो RT मारलेला tweet ट्विटर ट्रेंड server मध्ये fresh/नविन ट्वीट म्हणूनच मोजला जातो.

(10) लक्षात ठेवा ट्विटर ट्रेंड ठराविक वेळेतच बनतो उदा. क्रिकेट मैचचे ट्रेंड अवघ्या 25-30 min बनतात !त्याला कारणही तसेच आहे हा खेळ संपूर्ण भारतात प्रचंड लोकप्रिय आहे त्यामुळे हजारो लोक ट्रेंड वर्ड mentain करून आपल्या प्रतिक्रिया सामना चालू असतानाच नोंदवायला सुरवात करतात आणि बघता बघता ट्रेंड उसळी घेत  टॉपवर पोहोचतो.

(11) तसेच TV चॅनेल्सचे राजकारण किंवा चालू घडामोडींवर ट्रेंड्स लगेच activate होतात कारण TV स्क्रीनवर सतत अमूकअमूक हैशटैग वापरा व तुमच्या प्रतिक्रिया कळवा असा msg स्क्रीनवर सतत फ़्लैश होत असतो लाखो लोक हे पाहत असतात मग हजार-पाचशे लोकांनी सहभाग नोंदवताच ट्रेंड लगेच उसळी घेत  टॉप लिस्टमध्ये झळकतो अर्थात ट्रेंड बनवताना न्यूज़ चैनल्स महत्वाची भूमिका बजावतो !
(12)याशिवाय राजकारण/समाजकारण /खेळाडू/ सिनेसृष्टीतील लोकांनी सहभाग नोंदवताच बरेच चाहते त्यांचे अनुकरण करतात याने एकूण सहभाग वाढतो व  ट्रेंड लगेच  झळकतो.

(13) जगात रोज क्षणाक्षणाला असंख्य घटना घडत असतात मग यावर असंख्य प्रतिक्रिया येतात  असे अनेक ट्रेंड आपोआप टॉप लिस्टमध्ये  झळकतात.

(14) भारतात रोज वरच्या स्थानी राहणाऱ्या ट्वीट्सच्या ट्रेंड्सची सरासरी 600-800 वेगवेगळे(unique) यूजर्स अंदाजे 1800+  unique ट्वीट्स हे गुणोत्तर बनले आहे(trendmap.com ची  आकडेवारी)
अर्थात  हे गुणोत्तर रोजरोज घडणाऱ्या घटनांवरून
किंचितसे बदलत असते!

(15) तर जगातील अर्थात worldwide top 5 ट्रेंड्ससाठी अंदाजे किमान 2500+ यूजर सहभाग नोंदवला जातो!(trendmap.com व hello@jungle.media.com यांची आकडेवारी)

(16)अर्थात अपेक्षित tweets चा पल्ला  सहज पूर्ण होतो  पण अपेक्षित सहभाग वाढणे अत्यावश्यक.



(17) तुम्हाला टॉप 35 ट्रेंड्स पाहायचे असतील तर trendmap.com या संकेतस्थळ उपलब्ध आहे याशिवाय ट्रेंडसंबधित सर्व माहिती ट्वीट्स रेट, एकूण mentions, top tweets, most fav.tweets, इतर ट्वीटर ट्रेंड्सशी तुलना यासह खुप बाबी येथे उपलब्ध होतात पण  तुम्ही trendmap.com ला registered असणे अत्यावश्यक आहे.

(18) याव्यतिरिक्त topsy.com हे संकेतस्थळ सुद्धा सर्वांना खुले आहे आपण सहज analysis करू शकता!

शेवटी एवढंच , ट्विटर ट्रेंड बनवणे एक प्रतिष्ठा/फैशन बनली आहे!

वरील माहिती मी शक्य तेवढी तंतोतंत देण्याचा प्रयत्न केला  असून यासाठी मला  google ची मोलाची साथ मिळाली तर अजून नेमकेपणा आणण्यासाठी
forums.digitaspy.co.uk , trendmap.com , topsy.com , hello@jungle.media.com या ट्विटरशी संबधित संकेटस्थळांवरही बहुमूल्य माहिती मिळाली!

धन्यवाद !  #happy_tweeting

बुधवार, १८ मार्च, २०१५

' ट्विटर ट्रेंड :मराठी संस्कृती अटकेपार नेण्यासाठीचे सर्वोत्तम माध्यम! 'रोखठोक..


' ट्विटर ट्रेंड : मराठी संस्कृतीला अटकेपार नेण्यासाठीचे सर्वोत्तम माध्यम'


नमस्कार, सोशल मीडियाचे वादळ सर्वत्र चांगलेच घोंगावत आहे . सोशल मीडियात twitter हे सर्वात प्रभावी माध्यम आहे,कारण सर्व प्रमुख बाबींची दखल घेणारे लोक,सामाजिक संस्थांची accounts,celebrities,राजकारणी,समाजकारणी,खेळाडू,अंतराळवीर,पत्रकार,न्यूज़ चैनल्स इ. अर्थात टॉप टू बॉटम क्षेत्रातील लोक twitter वर असतात त्यामागचे एक कारण म्हणजे tweet करताना टवीट्ची मर्यादा १४० एवढी नेमकी असते.म्हणजेच अगदी थोडक्यात नेमकेपणा आणण्याचा प्रयत्न होतो
लोकांना वाचण्यासाठीही छान वाटते.तसे पाहिले तर १४० अक्षरांत tweet परिपूर्ण होत नाही अशी सर्वांचीच ओरड असते पण tweet चे २-३ (हवे तेवढे) भाग करून आपल्याला ते tweet परिपूर्ण बनवता येऊ शकते.असो

         मी माझ्या मागील लेखात twitter trend म्हणजे काय असते? या बद्दल संपूर्ण पोलखोल केली होती.आता थोडे वेगळ्या मार्गाने थोडक्यात पाहू.....आपण हैश टैग न वापरता करत असलेल्या tweets पेक्षाही #टैग वापरून केलेले तुमचे tweet तुमचे followers नसलेलेही लाखो लोक पाहू शकतात. उदा. #मराठी काहीतरी ट्वीट ले तर #मराठी वर क्लिक करताच मराठी हा शब्द असणारे हजारो tweets आपण पाहू शकतो.म्हणून आपली चर्चा ठराविक विषयाभोवतीच् ठेवण्यासाठी हैशटैग/ट्रेंड हा concept twitter ने सुरु केला आहे याला जगभरातून प्रचंड प्रतिसादही मिळतो आहे खरेतर ट्रेंड हाच twitter चा अविभाज्य घटक आहे. म्हणून सर्व दिग्गज लोक/संस्था promoted(पैसे देवून) ट्रेंड करतात व स्वतः चे किंवा व्यवसायाची वृद्धी करतात.
      
       आता बोलुयात मराठीबद्दल! जगात हजारो भाषा बोलल्या जातात त्यामध्ये सर्वात जास्त मराठी बोलणाऱ्या भाषांत मराठीचा १५ वा क्रमांक लागतो खरंतर ही मराठी लोकांसाठी खुप अभिमानाची बाब आहे नाही का? संत परंपरा लाभलेली। आपली मराठी संस्कृती फारच महान आहे.या। मायमराठी भूमीत आतापर्यंत कला,क्रिड़ा,सांस्कृतिक,राजकारण,समाजकारण,पर्यटन,गड-किल्ले इ. सह बऱ्याच बाबींचा समावेश होतो! एवढ्या मोठ्या लोकांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्राला/मराठी संस्कृतीला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर किती कमी स्थान आहे किंवा हव्या त्या प्रमाणात त्या बाबी लोकांना माहिती नाहीत ही बाब जरा कमीपणाचीच वाटते नाही का?


      खरे बोलायचे झाले तर मराठी एवढी श्रेष्ठ भाषा असताना मराठी लोकांच्या एकमेकांच्या पायात पाय घालून मागे खेचण्याच्या स्वभावामुळे आपण मागे आहोत जसे प्रत्यक्ष जगताना एखाद्याला मागे खेचून आपलेच घोडे दामटवले जाते अगदी तसेच social media वर सुद्धा खुप खेचाखेचीचे प्रमाण कमी नाही...परवाच्या २७ फेब्रुवारीच्या
मराठीराजभाषादिनलाही तेच घडले! एकमेकांच्या मराठी हेव्यादाव्यांमुळे twitter वर तब्बल ३-४ ट्रेंड झळकले
आणि मराठी झेंडा मानाने जगभरात डोलवण्याची संधी 
घालवली त्यामुळे worldwide trend सोडाच् पण भारताच्या टॉप १० मध्येही स्थान नाही मिळवू शकला एकही मराठी ट्रेंड!  trendmap.com आणि topsy.com या संकेतस्थळावरून माहिती घेतली तर #मराठीदिन #अभिजातमराठी #मायमराठी या तिन्ही ट्रेंड्स मध्ये सहभागी झालेले यूज़र्स व ट्वीटल्या गेलेल्या एकूण ट्वीट्स लक्षात घेतले तर भारतातील त्यादिवशीचा नंबर १ तर जगातील नंबर ३ ट्रेंड बनला असता आणि मराठीचा झेंडा जगाच्या अटकेपार रोवला गेला असता!एवढी प्रचंड ताकद मराठी माणसांत नक्कीच असताना अशी बंडखोरी का? माझे एवढेच म्हणणे आहे
थोडासा आदर्श तमिल जनतेकडून घ्यायला हवा! कारण मराठी दिनाच्या ४-५ दिवसच अगोदर #जयतमिळ (तमिळ भाषेत बरं का!) हा जागतिक पातळीवरील ट्रेंड 
बनवून सर्वच क्षेत्रातील लोकांनी सहभागी होऊन
 कमालीची एकजुट दाखवली आणि तमिळ सातासमुद्रापलीकडे पोहोचवली! याला म्हणतात एकजुठ!
 
   याउलट एरवी मराठी भाषेचे पडद्यावर,टीवीवर,भाषणात
 गोडवे गाणारे दिग्गज लोकं, राजकारणी नियोजित हैशटैग वापरून ट्वीट करा अशी विनंती करूनही मुद्दामहुन  जुमानत नाहीत ! ही दुर्दैवाची बाब! बदलायला हवे हे सर्व नाही का?
माझे मराठीबद्दल फार प्रेम उतू जायला लागले आहे अशातला हा भाग मुळीच नाही पण मी वस्तुस्थिती कथन केली!

शेवटी माझ्या आकलनानुसार अगदी थोडक्यात सांगतो 
ट्विटर ट्रेंड्स च्या माध्यमातून आपली मायमराठी भाषा,
संस्कृती जगपातळीवर झळकवण्यासाठी मराठी लोकांनी
अशा मराठी ट्रेंड्स उपक्रमात वेगळी चुल न मांडता एकीचे। दर्शन घड़वावे हीच अपेक्षा, कारण देशपातळी-जगपातळी
वर  मराठी संस्कृतीचा झेंडा सहजरित्या उंच डोलवायचा असेल तर 'ट्विटर ट्रेंड' हेच आजघडीचे सर्वात प्रभावी माध्यम आहे
ही वस्तुस्थिती आहे....धन्यवाद!

Gopal Madane
Twitter -> @madanegopal
www.gopalmadane.blogspot.in
         

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०१५

"हा ट्विटर ट्रेंड बनतो तरी कसा बरं…? संपूर्ण पोलखोल"


      सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा विशेषतः शिक्षित पिढीचा अविभाज्य घटक आहे, यामध्ये प्रामुख्याने Facebook,  instagram, Telegram, hike, यु ट्यूब, ऑनलाइन व्यवहार इ.यासह ब-याच गोष्टीमुळे जग जवळ आले आहे.सोशल मीडियात सर्वात जास्त फेसबुक वापरणारे व त्याखालोखाल ट्विटर वापरणारे(users) आहेत,दोन्ही गोष्टीचा विचार (facebook&twitter) करता दोन्हीकडे सर्वात जास्त लोकप्रिय बाब म्हणजे ट्रेंड्स अर्थात trends !आणि हेच ट्रेंड्स बनतात तरी कसे याबाबत आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात…twitter वर सर्वाधिक वापरकर्ते भारतीय आहेत.भारत ही जगातील सर्वात मोठी उपलब्धी आहे हे जाणून चाणाक्ष twitter ने नुकतेच दहा भारतीय भाषामधून ट्रेंड्स सुरु केले आहेत यात प्रामुख्याने हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू इ प्रमुख भाषा समाविष्ट आहेत…
आता पाहुया की twitter वरील या लोकप्रिय ट्रेंड्स(trends) बद्दल सर्वांच्या मनात असणारे काही प्रश्न………
(1)ट्रेंड (trend) म्हणजे काय? तो कसा बनतो?
(2)या ट्रेंड्सला एवढे महत्त्व का?
(3)trend ला हैश(#) का वापरतात?
(4)या ट्रेंड्सचे प्रकार किती व कोणते?
(5)एक local trend बनायला किती वेळ लागतो?
(6)एक worldwide trend बनायला किती वेळ लागतो?
(7)किमान किती tweets केल्यानंतर twitter ट्रेंड बनून टॉप 10 मध्ये येतो.
(8)ट्रेंड कोठून बनतो अर्थात याला काही server location आहे का?
(9)ट्रेंड बनवायचा असेल तर किती लोकांचा सहभाग असावा?
(10)trends बनताना retweet गृहीत धरले जाते का?
(11)Trends मधील tweets कशा मोजल्या जातात?यासाठी कोणते संकेतस्थळ आहे का?
(12)promoted trend म्हणजे काय?याचा उपयोग काय?
(13)सेलेब्रिटींचे ट्रेंड्स लगेच बनतात मग सर्वसाधारण users नी प्रयत्न करूनही trend का बनत नाही?
(14)दिवसात जास्तीत जास्त किती ट्रेंड्स बनू शकतात?बनलेला trend कितिवेळ टिकतो?

यासह बरेचसे प्रश्न सर्वांपुढे (twitter प्रेमीपुढे) पडले असतील,या सर्व प्रश्नाची एकत्र माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात…
 "ट्विटर ट्रेंड हा hashtag(#) जोडून एखाद्या लोकप्रिय शब्दाचा आधार घेवुन ठराविक वेळेला ठरवून केला जातो तर काही ट्रेंड्स त्यादिवशी घडलेल्या घटनेविषयी यूजर्सकडून त्याबद्दल चर्चा होवून बनतो. उदा.#IndvsPak #MakeinIndia #मराठीदिन इ. यामध्ये हैश(#) कीवर्ड किंवा phrase आहे या # ला विशेष महत्त्व आहे कारण # लिंक म्हणून काम करतो…थोडासा फरक बघा बिगर हैश 'मराठी' व '#मराठी' यात #मराठी clickble अर्थात लिंकसारखा असल्याने आपण त्या hashtag शब्दाच्या सर्व ट्वीट्स पाहू शकतो पण जर#नसेल तर तो शब्द clickble नसतो,आता तुम्ही म्हणाल #नसलेले शब्द सुद्धा ट्रेंड कसे बनतात? अहो बनणारच! twitter चा असा कोणताही नियम नाही की तुम्ही ट्रेंड बनवताना #(हैश) जोडले पाहिजे! हैश हा clickble असल्याने सर्वांच्या सोईसाठी त्या शब्दाशी संबधित tweets पाहता याव्यात यासाठीच # जोडतात।
ट्विटर ट्रेंड्स मध्ये promoted ट्रेंड्स हासुद्धा पर्याय असतो अर्थात यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात.मोठे उद्योग जगतातील लोक व्यवसायाची व स्वतः च्या संस्थेची वृद्धि करण्यासाठी याचा #promoted trend च्या माध्यमातून प्रचार प्रसार करतात…2-3 tweets सुद्धा पुरेशा असतात प्रमोटेड ट्रेंड बनण्यासाठी…अजब बाब आहे ना?! असो अर्थात इथे पैसा बोलतो!
यात(promoted) राजकारणी,सेलिब्रिटी,उद्योगजगत यातील लोक प्रामुख्याने असतात. असो……

आपल्याला जगातील सर्व देशाचे ट्रेंड्स काय आहेत हे पाहता येते.त्यासाठी तुम्हाला Discover मध्ये जावून trends हा पर्याय उघडून सेटिंगमधून आपण ठिकाण (location) बदलून त्या त्या देशाचे टॉप 12-13 लोकल ट्रेंड्स काय आहेत हे पाहू शकता.असे शेकडो ट्रेंड्स  दर 4-5 तासाला वापरकर्त्याच्या(users) च्या प्रतिसादानुसार बदलत असतात…किंवा लोकल ट्रेंड्स अगदी शहरानुसार
पहायचे असल्यास तुम्ही www.tweetindiamap.com या संकेत स्थळावर भेट देवून सखोल माहिती घेऊ शकता…

 आता पाहुयात twitter ट्रेंड बनण्यासाठी कोणता फ़ॉर्मूला By default ट्विटरकडून वापरला जातो…अर्थात ट्विटर ट्रेंड कसा बनतो.
ट्विटरचे analysis, design, coding, implementation या बाबी अतिशय सखोल करण्यात आल्या आहेत… "एकाच ठराविक वेळी एकाच विषयावर(ट्रेंड) tweeting करणारे लोक(users) व tweets ची संख्या यावर ट्रेंड बनतो"
अमेरिकेतील twitter वरील बाबींचे संशोधन करणा-या hello@jungle_media.com व forums. digitaspy.co.uk यांच्या सर्वेनुसार (आकडेवारी dec 2012)
दिवसाला 1.9 millian (19 लाख) लोकांकडून सरासरी 631737 एवढ्या tweets होतात तर प्रतितास 48433 एवढ्या tweets चा पाऊस पडतो।
आता पाहुया local+worldwide ट्रेंड कसा बनती?
(1)मध्यरात्री 12:00am-6:00am = अंदाजे 1200 tweets व वेगवेगळे 500 यूजर्स.
(2)सकाळी 6:00am-12:00pm =अंदाजे 1700 tweets व वेगवेगळे 733 यूज़र्स
(3)दुपारी 12:00pm-6:00pm = अंदाजे 1500 tweets व वेगवेगळे 812 यूजर्स
(4)सायं 6:00pm-12:00am = अंदाजे 1900 tweets व वेगवेगळे 922 यूजर्स

अर्थात ही आकडेवारी 2012 ची आहे…
2013, 2014 या दोन वर्षात झपाट्याने वाढलेले दुप्पट तिप्पट twitter वापरकर्ते पाहता
वरील आकडेवारीत 70-80% tweets व वापरकर्ते वाढवावे लागतील…
forum.digitspy.co.uk व hellow@jungle_media.com व ट्विटर experts च्या संशोधनाचा मेळ घातला तर सध्याची 2015 च्या ताज्या आकडेवारीनुसार
ट्रेंड खालीलप्रमाणे बनेल…

(1)मध्यरात्री 12:00am-6:00am = अंदाजे 3800 tweets व वेगवेगळे 1525यूजर्स.
(2)सकाळी 6:00am-12:00pm =अंदाजे 4700 tweets व वेगवेगळे 2100 यूज़र्स
(3)दुपारी 12:00pm-6:00pm = अंदाजे 4350 tweets व वेगवेगळे 2275 यूजर्स
(4)सायं 6:00pm-12:00am = अंदाजे 5050 tweets व वेगवेगळे 2375 यूजर्स

अर्थात हा सर्वे अमेरिकन (वेळ)घड्याळानुसार आहे! एकंदर एखादा ट्रेंड बनण्यासाठी 'ते' एकुण tweets ,सामिल झालेले एकूण यूज़र्स आणि वेळ या तिन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात…एक महत्वाची बाब म्हणजे ट्रेंड्स बनताना Retweet सुद्धा समाविष्ट/गृहीत धरले जातात.म्हणजेच जेवढ्या वेळा तो शब्द retweet केला गेला तेवढ्या वेळा तो गृहीत धरला जातो! उदा. #मराठी एखाद्या tweet मध्ये10वेळा आला असेल व दुस-याने तो tweet हा Retweet केला तर आणखी 10 काउंट होते…ट्रेंडसाठीची वरील आकडेवारी पाहता number of tweets चा criteria लगेच पूर्ण होतो पण अपेक्षित लोकांचा सहभाग जास्त असणे अत्यावश्यक आहे…एवढेच!

आणखी एक बाब खरंतर वरच नमूद करायला हवी होती ती म्हणजे किमान 1-2 verified account वरून trend चे tweets झाल्यास ट्रेंड twitter trend लवकर बनतो 

ट्रेंड्स ची मागील 7 दिवसांची history, जगातील कोणत्याही भागातील जुने किंवा ताजे लोकल ट्रेंड्स सखोल पाहण्यासाठी www.trendsmap.com या संकेत स्थळाला अवश्य भेट द्या…
खुप खुप धन्यवाद :-)


(वरील आकडेवारी (trends:time,total tweets&participate user)  ही संकेतस्थळानुसार असून एकूण सरासरी आहे…एखाद्या दिवशी काही महत्वाच्या ब-या वाईट घटना घडल्यास यूजर्स कमीजास्त होऊ शकतात! याने वरील गुणोत्तर किंचित कमी जास्त होऊ शकते!)

(Twitter ID → @madanegopal)

रविवार, १५ फेब्रुवारी, २०१५

" भारताची 'विराट' कामगिरी : भारत जोमात;पाक कोमात ! "


     आज झालेला भारत-पाकिस्तान हा सामना सर्वांना खुप आनंद देऊन गेला…कारण हा रविवार वाया गेला असे कोणी बोलणार नाही…काय match झाली राव आज !! टीम इंडिया
2 महीने Australia त होती पण या कालावधीत विजयाने टीमला कधी स्पर्शच झाला नाही! दोन्ही मलिका आपण हारलो(one-day series व test series) कदाचित यानेच की काय भारतीय चाहत्यात यंदा
फारसा उत्साह कुठे दिसत नव्हता अगदी विश्वचषक स्पर्धा सुरु झाली तरी सर्वजण फक्त भारत-पाकिस्तान match चीच वाट पाहत
होते काल(matchच्या पूर्वसंध्येला)
 पाक मीडियावाले खुप तावातावाने जुना रिकॉर्ड काढून सांगत होते
की पाकिस्तानच जिंकणार…आम्ही(पाकने) भारताविरुद्ध 60-65% सामने जिंकलेत !हो हे खरं आहे…पण तो काळ 1970-1990 पर्यंतचा होता
त्यावेळी आपली टीम फारशी बळकट नव्हती…पण1990 नंतरचा रिकॉर्ड बघितला तर 75% सामने भारताने जिंकलेत हे समोर येईल…worldcup चा record जर पाहिला तर मग100% सामने अर्थात सर्व 6 सामने आपणच जिंकले आहेत…
पण पाकिस्तान मीडिया वाले यागोष्टीवर न बोलता जुने रिकॉर्ड काढून
दाखवत होते किंवा भारताचा मागच्या Australia दौ-यात case to case भारतीय players ची कामगिरी दाखवत होते…असो तो
     मी काल 2 पाक news चैनल्सचे शो
पाहिले होते  सर्वत्र अगदी एकतर्फी विश्लेषण सुरु होते यात युसूफ योहाना सकलेन मुश्ताक व बरेच पाकिस्तानी एक्सपर्ट होते अगदी संवेदना हरवल्यासारखे त्यांचे विश्लेषण होते…
त्यात भारताला खुप खुप कमी लेखण्यात आले होते…
पण आता पाहिले त्याच पाक
मीडिया व पाक एक्सपर्टची
 खुप गोची झालीय…
त्यांचे frustration ते आता त्यांच्याच
खेळाडूंवर ताव काढत आहेत ! एवढे झेल सुटले तेवढे झेल सुटले याने batting खराब केली अमुक-तमुक खुप आरोप चालू झालेत…अजुन एक ताजी माहिती अशी की,
हा पराभव जिव्हारी लागलेल्या
काही पाक चाहत्यांनी teampakistan
हरली म्हणून रस्त्यावर बाहेर येऊन TV फोडले
अफ्रिदीच्या घरासमोर येवून विरोधात घोषणा
दिल्या…इतर match च्या बाबतीत

हे घडत नाही
पण भारत-पाक पारंपरिक प्रतिस्पर्धी
 खुप खुन्नस
'विश्वचषक जिंकला नाही तरी चालेल
 पण एकमेकाविरुद्धचा सामना आपण जिंकलाच
पाहिजे" अशी दोन्ही देशाच्या लोकांची
अपेक्षा असते…मग यापैकी जो हरेल त्यांचे
समर्थक आपला राग खुप वाईट पद्धतीने
व्यक्त करतात जो पाकिस्तानी चाहत्यांनी
केला…असो…भारताच्या बाबतीतही हेच झाले असते नाही का ??



   आजच्या सामन्यावर येवुयात……
पुन्हा एकदा आम्हीच राजा हे भारताने
पाकला
सुनावले…एक गोष्ट आवडली ती म्हणजे
हा संवेदनशील सामना खिलाडूवृत्तीने झाला ही जमेची बाजू।
विराट कोहलीने पुन्हा
आपले नाणे
खणखणीत वाजवून दाखवले!
विराटचे अर्धशतक किंवा शतक
म्हणजे भारताचा विजय हे समीकरणच बनलेले आहे कारण भारत विराटमूळे 85-90% सामने जिंकला आहे यावरून कोहलीचे योगदान अधोरेखित होते…आज केलेले शतक सुद्धा याचेच उदाहरण…
अर्थात नवा सचिन म्हणजेच विराट कोहली असे मी तर मानतो बाबा! सचिनचे खुप सारे विक्रम तोच मोडू शकतो असे अनेक क्रिकेटसमीक्षक जाहिर बोलतात…
शिखर धवनलासुद्धा पुन्हा सुर गवसला…ही
जमेची बाजू! आज त्याने 73 धावांचा
 खेळ केला…
रैनाने तर धडाकेबाज फिफ्टी करून धमाल उडवून दिली…मी तर पूर्वीपासुनच रैनाचा चाहता…त्याचा पुलशॉट
खरच लाजवाज असतो…आज सुद्धा तो खास शैलीत दिसला. रैना असेल तर "रैना है ना"
असे लोक का म्हणतात!
   आपला कर्णधार माही अर्थात धोनीची
कैप्टनशीप किती अव्वल आहे हे आज
पुन्हा एकदा दिसलेच! कोणाला कधी bowling द्यायची

 हे त्याला लगेच समजते!
रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आज जरी
लवकर बाद झाले असले तरी दोन्ही मुंबईकरात
खुप talent आहे…यापुढील सामन्यांत दिसेलच
हे…जडेजा अश्विन हे अष्टपैलू सुद्धा ब-यापैकी
फॉर्ममध्ये आहेत…मोहित शर्मा,उमेश यादव,मोहम्मद शमी आज खुपच प्रभावी ठरले(अपवाद काही षटकांचा).अपेक्षा
करतो यापुढेही स्पर्धेत आपल्या सर्व गोलंदाजांचा
सुर चांगला राहिल…आज संधी न मिळालेला
अंबाती रायडू, अक्षर पटेल,भुवनेश्वर कुमार
सुद्धा खास खेळाडू आहेत…संधी मिळाली
तर ते सुद्धा त्याचे सोने करतील यात शंका नाही…!

    एकंदर आज सर्वत्र एक देश
 एक रंग एक आवाज
इंडिया इंडिया इंडिया……भारत माता की जय असे एक ना अनेक आवाज संपूर्ण भारतात
 घुमत होते मी सुद्धा माझ्या काही मित्रांसोबत
या सामन्याचा आनंद लुटला…खरच एका
match ने भारतीय क्रिकेट चाहत्यात एक नवा
रंग भरला आहे…आता नक्की यापुढे लोकांत
उत्साह भरेल…अशी आशा करुया! आता
येत्या रविवारी २२ फेब्रुवारीला
भारत-द.अफ्रीका हा थरार आपल्या सर्वांना
अनुभवता येईल…हा सामना सुद्धा रोमांचक होईल यात शंका नाही! भारतीय संघ विश्वचषक आणेल का याबाबत उत्कंठा आहे याला खुप अवकाश आहे कालांतराने सर्व
 गोष्टी स्पष्ट होतीलच…पण माझा ठाम विश्वास आहे
भारत उपांत्य फेरी सहज गाठेल…आणि कदाचित
अंतिम फेरी सुद्धा! पण अशीच दर्जेदार सांघिक कामगिरी
व्हायला हवी
       माझ्या भारतीय संघाला खुप खुप शुभेच्छा।
"कहो दिलसे……भारत फिरसे" jay hind jay bharat!

धन्यवाद ! :)

(हा ब्लॉग msoffice व wordpad वापरून type केला आहे व मोबाइल द्वारे post केला आहे त्यामुळे समास/paragraph हवे तसे पोस्ट होत नाहीत समजुन घ्या धन्यवाद :) )




मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५

"Western courtiers ahead with 4G, 5G,now 6G … futured 2020's worldsuperpower Indians stucked in 2G & 3G ! and (1G to 6G) details"

    All western countries are using 4G ,recently launched 5G and now 6G on the way of launching within some months. New versions of Android,Blackberry,I-phone and some   other advanced technologies new featured mobile phones are launching or come in market.western all countries including USA,England,Australia so many countries rapidly growing because of such revolution in information technology! Now talk about India, According deram or vision of farmer president dr.A.P.J.Abdul Kalam on 2020 India will be superpowercountry in the world. In case of information there is need to educate all India in IT. In india only 40-45 % people are using internet,while almost 50-55% people are unaware about internet and technology. The main reason is that illiteracy.According to one servey in America almost 80-85% people are always using internet. 4G or 5G.fact but In india only 3-5% people are using 4G network while 30% people are using 3G network. In india 75%+ in rural area there isn’t reached 3G. So how we can become super nation before 2020.in case of muscle power we are top in the world. similarly in case of knowledge we are top.i mean we have all kinds of abilities. One big question always come in my mind is that why India is so back about generation technologies in india 40% city area there is 4G reached what about remaining 60% city area . let alone rural area for 4G,because most of rural areas are still waiting for 3G unfortunately . See another side i.e. top most countries USA,England,Japan are ready to launch 6G technology! #fact Let it go lets talk about 1G ,2G,3G,4G,5G,6G technologies step by step. Will get ideas about all those things.
What is 2G ?
Second Generation (2G) wireless cellular mobile services was a step ahead of First Generation( 1G) services by providing the facility of short message service(SMS) unlike 1G that had its prime focus on verbal communication. A typical 2G G.S.M network service ranges from 800/900MHz  The bandwidth of 2G is 30-200 KHz.

Let us examine what these 3G & 4G have rather than that of 1G and 2G.

Analysis of 1G and 2G services
In 1G, Narrow band analogue wireless network is used, with this we can have the voice calls and can send text messages. These services are provided with circuit switching. Today’s the usual call starts from the beginning pulse to rate to the final rate. Then in case of 2G Narrow Band Wireless Digital Network is used. It brings more clarity to the conversation and both these circuit-switching model.

Both the 1G and 2G deals with voice calls and has to utilize the maximum bandwidth as well as a limited till sending messages i.e. SMS. The latest technologies such as GPRS, is not available in these generations. But the greatest disadvantage as concerned to 1G is that with this we could contact with in the premises of that particular nation, where as in case of 2G the roaming facility a semi-global facility is available.

What is 3G Generation
But to overcome the limitations of 2G and 2.5G the 3G had been introduced. In this 3G Wide Brand Wireless Network is used with which the clarity increases and gives the perfection as like that of a real conversation. The data are sent through the technology called Packet Switching .Voice calls are interpreted through Circuit Switching. It is a highly sophisticated form of communication that has come up in the last decade.

In addition to verbal communication it includes data services, access to television/video, categorizing it into triple play service. 3G operates at a range of 2100MHz and has a bandwidth of 15-20MHz. High speed internet service, video chatting are the assets of 3G.

How is 2G different from 3G?

In comparison to 2G customers will have to pay a relatively high license fee for 3G.
The network construction and maintenance for 3G is much expensive than 2G.
From the point of view of customers, expenditure will be excessively high if they make access to various facets of 3G.

Main 3G Services
With the help of 3G, we can access many new services too. One such service is the GLOBAL ROAMING. Another thing to be noted in case of 3G is that Wide Band Voice Channel that is by this the world has been contracted to a little village because a person can contact with other person located in any part of the world and can even send messages too. Then the point to be noted is that 3G gives clarity of voice as well can talk with out any disturbance. Not only these but also have entertainments such as Fast Communication, Internet, Mobile T.V, Video Conferencing, Video Calls, Multi Media Messaging Service (MMS), 3D gaming, Multi-Gaming etc are also available with 3G phones.

Main 4G Features
When It is still to estimate as to how many number of people have moved on from 2G to 3G , technology has come up with the latest of its type namely 4G.A successor of 2G and 3G, 4G promises a downloading speed of 100Mbps and is yet to shower its wonders on. then with the case of Fourth Generation that is 4G in addition to that of the services of 3G some additional features such as Multi-Media Newspapers, also to watch T.V programs with the clarity as to that of an ordinary T.V. In addition, we can send Data much faster that that of the previous generations.

What is the reason for delay in implementing 3G and 4G Mobile services?
It is very sad to say that the 3G services had only reached with in some towns of china, so that it may take time to reach to Other countries. Another major defect of this is that Wide Band Frequency Spectrum, which is needed for 3G, is lacking. Another reason for this is that it a cost bearing item especially for sending data. So for us it is a higher one which could be used only by upper classes. If it should be accepted among all customers, firstly it should be availed at a lower rate, for which the rate of spectrum should be declined.

What is 5G Technology
5G Technology stands for 5th Generation Mobile technology. 5G mobile technology has changed the means to use cell phones within very high bandwidth. User never experienced ever before such a high value technology. Nowadays mobile users have much awareness of the cell phone (mobile) technology. The 5G technologies include all type of advanced features which makes 5G mobile technology most powerful and in huge demand in near future.

The gigantic array of innovative technology being built into new cell phones is stunning. 5G technology which is on hand held phone offering more power and features than at least 1000 lunar modules. A user can also hook their 5G technology cell phone with their Laptop to get broadband internet access. 5G technology including camera, MP3 recording, video player, large phone memory, dialing speed, audio player and much more you never imagine. For children rocking fun Bluetooth technology and Piconets has become in market.
What is 6G technology ?
1. Increase performance and maximize your data throughput and IOPS
2. Protect your system and secure your data
3. Ease your service and build efforts and expand your data center configuration options

The 6G technology haven't been fully revealed yet but the search phrases like what is 6g mobile technology, 6G technology, 6G mobile, 6G network, 6G wiki, 6G technology ppt are getting more familiar with new mobile technology getting evolved.

All was detailed information from1G to 6G. Now only one thing always come in my mind is why India is back even here bunch of knowledge. but nothing reach on time in case of Technology.
Just imagine top most countries on the way of launching 6G technology. But half of population still waiting for 3G isn't terrible reality? Leave it…
 Without technology can India become 'Super Power Nation' ?
India is capable to  achieve everything and India already showed time to to time. But in case of information technology we are too too far. that's why most of Indian IT students prefers USA, Britain countries etc.
Personally Indian administrator should think on it... that's it!
Thank you very much!

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

"Words- lot to learn……"

I am  sharing here one amazing 1 letter word to 10 letter word, how it relates with our life. enjoy…



"Words- lot to learn "




The most damaging one(1) letter word →‘I’ avoid it. 

The most satisfying two(2) letter word →‘WE’ use it.

The most poisonous three(3) leter word →‘EGO’ kill it. 

The most used four(4) letter word  →‘Love’ value it.

The most pleasing five(5) letter word  →‘Smile’ keep it. 

The fastest spreading six(6) letter word  →‘Rumour’ ignore it. 

The most enviable seven(7) letter word  →‘Success’ achieve it.

The most notorious eight(8) letter word  →‘Jealousy’ distance it.

The most nine(9) letter word →‘knowledge’ acquire it.

The most essential ten(10) letter word →‘Confidence’ trust it.


 Whenever I was in college for degree first year(2009-10) that time in college magazine this my writing were get published. Again I am sharing here those magical words relevant  ideas. 

Hope you like this :-)


thank you very much !!

स्वत:चे ब्लॉगस्पॉट संकेतस्थळ कसे सुरू कराल?

मला आठवतंय शाळेत असताना “माझी रोजनिशी” नावाचा एक धडा होता,त्यात रोज घडणार्‍या बाबी त्यात लिहून काढणे हा त्या मागचा उद्देश ज्यातून आपल्या चु...