रविवार, २५ जानेवारी, २०१५

७/१२ म्हंजी कायरं भाऊ !!


काय आहे 7/12 ची कथा!

मी इयत्ता 10 वीत असताना सरांनी मला हा प्रश्न विचारला होता, काय रे ! सात-बारा आणला म्हणतोस
सांग…7/12 नक्की काय भानगड आहे…मी 3-4 दिवस मागितले देशपांडे सरांना…पण नाही सांगू शकलो!
पुढे sir ची बदली झाली… आणि मी नविन ठिकाणी 11 ववी साठी admission घेतले अन हा प्रश्न अनुत्तरित राहिला तब्बल 10 वर्षे…
त्यावेळी google ची (नेट ची बरका!) सोय असती तर किती बरे झाले असते राव…असो…
माझा एक एमएससी एग्री आहे…त्याला नुकतेच विचारले
हा7/12 matter…अन त्यांनी लगेच सांगितले त्याचे description असे…
" साधारणपणे भारतामध्ये घराचा (Real Estate) व्यवहार करताना 'सात बाराचा उतारा' आणावा लागतो हे बहुश्रुत आहे. 'सात बारा' हे कुठल्याही कायद्याचे क़लम नव्हे. हे अहिल्याबाई होळकरांनी दिलेले योगदान आहे. त्यांनी सरकारी ख़र्चाने ग़रीब माणसाच्या शेतात १२ फ़ळझाड़े लावली. त्यातील सात झाड़े त्या गरीबाची आणि पाच झाड़े सरकारची! बारा झाडांची निगा राखून, सात झाडांची म्हणजे 7/12! फळे स्वतः खावयाची आणि राहिलेली पाच झाडांची फळे, म्हणजे 5/12 सरकारकडे जमा करावयाची, ती इतर गरीबांना वाटण्यासाठी. त्यासाठी एक सरकारी दफ़्तर निर्माण करुन ह्या झाडांची नोदं करण्यात आली. ह्या नोदींच्या उताऱ्याला 'सात-बाराचा उतारा' म्हणण्याचा प्रघात पडला, तो आज गायत चालू आहे."
अशी ही गाथा…;-)
कोणी विचारले तर कधी विसरणार नाही मी……काय म्हणजे……:) अहो सात-बारा !!
:P

(हा ब्लॉग स्वतः लिहिला आहे……अन जेव्हा लिहू वाटेल तेव्हा लिहीन!!) आभारी आहे!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वत:चे ब्लॉगस्पॉट संकेतस्थळ कसे सुरू कराल?

मला आठवतंय शाळेत असताना “माझी रोजनिशी” नावाचा एक धडा होता,त्यात रोज घडणार्‍या बाबी त्यात लिहून काढणे हा त्या मागचा उद्देश ज्यातून आपल्या चु...