सोमवार, २६ जानेवारी, २०१५

२६ जानेवारी आणि ग्रामीण समाज !

२६ जानेवारी अर्थात गणतंत्र दिवस…

२६ जानेवारी पासून भारतात संविधान लागू करण्यात आले. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्षे ११ महिने १७ दिवस सतत सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची लिहले.

संविधान लिहितांना डॉ . बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी केली नाही .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दादासाहेब गायकवाड यांना पत्र लिहिले आणि स्वतःच्या तब्बेतीबद्दल ते ह्या पत्रात म्हणतात कि ," माझी प्रकृती कोसळणार नाही अशा तऱ्हेने मी तग धरत आहे ." बाबासाहेब आंबेडकरांचे आयुष्य समाजसेवेशी कसे निगडीत आहे हे अत्यंत कळकळीने व्यक्त करतांना ते पुढे लिहितात :-
" माझी खात्री आहे कि , आपल्या लोकांचे कार्य पार पाडण्यासाठी जेवढा काळ लागेल तेवढ्या काळ पर्यंत मला आयुष्य लाभेल. माझ्या खालावलेल्या प्रकृती बद्दलची निराशा दूर करून हा निश्चय मला जीवनदान देत आहे . "

डॉ.बाबासाहेबांनी जगातील सर्व प्रगत राष्ट्रांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची राज्यघटना बनविली . त्या घटनेप्रमाणे २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. स्वातंत्र्य ,समता व बंधुता या त्रयींवर आधारलेले लोकशाही राज्य म्हणून भारत हे राष्ट्र जगाच्या पाठीवर उभे राहिले .

ही झाली एक बाजु पण आपला समाज विशेषतः ग्रामीण भाग इतका मागासलेला आहे की त्यांना
प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही…
याला गरीबी निरक्षरता अशा अनेक बाबी जबाबदार आहेत।
मी राहत असलेल्या सोलापुर जिल्ह्यात be frankly सांगायचे झाल्यास 50%+ लोकांना 26jan/15 aug म्हणजे फक्त jhendavandan असते एवढेच माहित आहे…कारण 67 वर्षात त्यांच्या जीवनात फारसा फरक पडलेला नाही………ही भयानक बाब आहे…असो।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वत:चे ब्लॉगस्पॉट संकेतस्थळ कसे सुरू कराल?

मला आठवतंय शाळेत असताना “माझी रोजनिशी” नावाचा एक धडा होता,त्यात रोज घडणार्‍या बाबी त्यात लिहून काढणे हा त्या मागचा उद्देश ज्यातून आपल्या चु...