रविवार, २५ जानेवारी, २०१५

शाळा !!


शाळा....

शाळा सोडताना....
खरं म्हणजे आम्हाला
महितच नव्हतं,
शाळा सोडण्यात एवढ़ं
काय विशेष होतं;

मुली मात्र शेवटच्या दिवशी
सारख्या रडत होत्या,
सरांपासून शिपयांपर्यंत
सर्वांच्या पाया पडत होत्या;

मला आठवतंय आम्ही
रडणाऱ्या मुलींची
जाम खेचली होती,
खरं तर डोळ्यातलं पाणी लपवताना
आमचीच गोची झाली होती;

एकमेकांकडे पाहुन लगेच
सावरलं आम्ही स्वत:ला,
मनाशीच म्हटलं आता
उगीच रडायाचं कशाला?

भले शाळेतली काही
जुनी 'नाती' तुटतील,
त्यात काय एवढं
कॉलेज मध्ये 'नवीन' भेटतील...

दिवस,वर्षं कशी जातील
कळणार नाहीत,
पुन्हा कधी पावलं इथे
वळणार नाहीत...

रडावसं वाटत होतं पण
कुणीच रडलं नाही,
शाळेतुन बाहेर पडताना
वळुनही पाहिलं नाहीं....

पण आता मात्र
शाळेत जावसं वाटतंय,
शेवटच्या बाकावर
बसावसं वाटतंय...

शाळेतल्या तासांपेक्षा
मधल्या सुट्टीचीच
सर्वाना ओढ़ असायची,
कारण तेव्हाच सर्वाना
'आपली माणसं' भेटायची....

आज मात्र बरोबर कुणीच नसतं,
शाळेच्या आठवणिने रडताना;
असं वाटतं तेव्हाच
रडायला हवं होतं, शाळा सोडताना........


(हा माझा पहिला ब्लॉग आहे……अर्थात कविता) इथून पुढे मी वेळ मिळेल त्याप्रमाणे ब्लॉग लिहीन !!
Love you all !!!

1 टिप्पणी:

  1. Baccarat | Best Online Baccarat Site - FBCASINO
    The online version of the game 인카지노 has been designed to play against real money people and players. It was 바카라 designed with 1xbet high-quality graphics to attract players with

    उत्तर द्याहटवा

स्वत:चे ब्लॉगस्पॉट संकेतस्थळ कसे सुरू कराल?

मला आठवतंय शाळेत असताना “माझी रोजनिशी” नावाचा एक धडा होता,त्यात रोज घडणार्‍या बाबी त्यात लिहून काढणे हा त्या मागचा उद्देश ज्यातून आपल्या चु...